शरद पवारांच्या भेटीत काय झाली खलबतं; एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं
Sharad Pawar Meet Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली आहे. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पवार हे वर्षा बंगल्यावरून निघून गेले आहेत.
शरद पवार यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आत्ताची ही भेट का महत्वाची आहे त्याविषयी अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली आहे, असे शिंदेंनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीतूनचं शड्डू पडल्यानंतर कोल्हेंच्या लांडेंना शुभेच्छा; म्हणाले, शर्यत अजून….
शरद पवार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली आहे. ही राजकीय भेट नव्हती. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. त्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. कोणतेही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
शरद पवारांच्या भेटीत काय झाली खलबतं; एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं
दरम्यान, या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. उद्धव ठाकरे हे सध्या देशाच्या बाहेर आहेत आणि अशा परिस्थितीत पवारांनी ही भेट घेणं या विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे, असे बोलले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर या भेटील वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.