जनताच काय ? बंगले, नवे वाहनेही पाहतायत नव्या मंत्र्यांची आतुरतेने वाट !
प्रफुल्ल साळुंखेः विशेष प्रतिनिधी
Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांचे आलिशान वाहने हे जनतेसाठी अप्रूप असते. तर अनेक मंत्री नवे कोरे वाहने मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. या विस्ताराकडे भाजपचे आमदार, शिंदे गटाचे आमदार डोळे लावून असले आहेत. अनेक जण मंत्रिमंडळात समावेश होईल, यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेकांनी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी नवे सूट घेतले आहे.
शरद पवारांच्या भेटीत काय झाली खलबतं; एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त दोन्हीकडे नऊ-नऊ मंत्रिपदे आहेत. या मंत्र्यांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहेत. तर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहेत. मंत्रिमंडळ छोटे आहे. त्यामुळे वाहने कमी लागत आहे. अनेक खात्यांना स्वतंत्र मंत्री नाही. त्यामुळे त्यांची वाहने वापरली जात नाहीत. त्यामुळे अनेक वाहन मंत्रालय परिसरात धूळखात पडून आहे.
ठाकरेंचा परदेश दौरा अन् पवार पोहोचले शिंदेच्या घरी; काय झाली चर्चा, वाचा सविस्तर
त्याचबरोबर अधिकारी यांची वाहने अशीच धूळखात पडून आहेत. मंत्रालयात ठीक-ठिकाणी ही वाहने पार्क करण्यात आलेली आहे. त्यात साधारण 26 वाहने अशीच धूळखात पडली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. जसे वाहने मंत्र्यांविना पडून आहेत. तसेच अनेक बंगले देखील मंत्र्याविना बंद आहेत. मंत्रालयातील आयनॅक्स इमारतीत असलेली अनेक मंत्री कार्यालये लॉक करून ठेवण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारच्या नव्या तारखासमोर आल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार चार जून रोजी होऊ शकतो. चार जूनला न झाल्यास सात जूनला होऊ शकतो. सात जूनला नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नक्की होईल, असे भाकित सध्या व्यक्त केली जात आहेत. जोपर्यंत दिल्लीमधून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही हे नक्की. जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, तोपर्यंत वाहन, बंगले आणि कार्यालय यांना देखील आपल्या नव्या मालकाची प्रतीक्षा लागलेली आहे.