…म्हणूनच मी संजय राऊतांचं पूर्ण नाव घेतो; नितेश राणेंनी सांगितलं कारण…

Nitesh Rane : संजय राऊत (Sanjay Raut) यांना स्वत:च्या मालकाचं नाव माहित नाही त्यामुळेच मी त्यांचं नाव पूर्ण नाव घेत असतो, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; फडणवीसांनी केलेल्या टीकेला […]

नितेश राणेंना धक्का, कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरटं; नेमकं काय घडलं?

नितेश राणेंना धक्का, कोर्टाने बजावलं अजामीनपात्र वॉरटं; नेमकं काय घडलं?

Nitesh Rane : संजय राऊत (Sanjay Raut) यांना स्वत:च्या मालकाचं नाव माहित नाही त्यामुळेच मी त्यांचं नाव पूर्ण नाव घेत असतो, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

‘त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; फडणवीसांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर गळ्यातल्या पट्ट्याबाबत टीका केली होती. या टीकेवर नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी गळ्याला पट्टा लावून राज्याला कसं मूर्ख बनवलं यावर एक नाटक तयार झालं पाहिजे, त्याची स्रिप्ट ठाकरेकडे तयार आहे, ते आजारी असल्याचं नाटक करीत होते, नाटक 2024 पर्यंत काढावं कारण त्यानंतर त्यांना तेच काम राहणार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

‘नाट्यगृहांसाठी भरीव निधी, सरकारकडं निधीची कमतरता नाही’; सुधीर मुनगंटीवारांनी ठणकावून सांगितलं

तसेच संजय राऊतांच्या गळ्यात कोणाचा पट्टा आहे. त्याचं नाव त्यांनी सांगावं. ज्याला स्वत:च्या मालकाचं नाव माहिती नाही, म्हणूनच मी त्याचं पूर्ण नाव घेतो. आपल्या गळ्यात कोणाचा पट्टा हे माहिती नाही हे त्यांनी सांगाव, सिल्वर ओकचा की मातोश्रीचा? असा सवाल नितेश राणे यांनी राऊतांना केला आहे.

फडणवीसांनी पुराव्याच्या कायद्याचा अभ्यास करावा पुरावे म्हणजे सत्य असं समजून कारवाई करावी असा सल्ला राऊतांनी दिला. त्यावर राणे म्हणाले, या कायद्यानूसार ज्या डॉक्टर महिलेनी राऊतच्या विरोधात जे पुरावे दिले आहेत ते पुरावे समोर ठेऊन राऊतला अटक करावी का? यावर फडणवीसांनी विचार करावा काय़ याचं उत्तर राऊतांनी द्यावं. पुरावे हेच सत्य असतील तर डॉक्टर बहिणीला शिव्या धमकावलं जात आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावलं जातंय, पुरावे आणतीय ते पुरावे पण पुराव्याच्या कायद्यांतर्गत धरावे का? याचं उत्तर द्या, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

अजितदादांची राजकीय ताकद किती? तटकरेंच्या उत्तराने विरोधकांना धडकी

दरम्या, राऊतांनी डॉक्टर महिलेच्या आयुष्यात रावणाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर बोलू नये, घरात आणि बाहेर रावणाची भूमिका निभावणाऱ्यांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिम्मत करु नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

मोहोळ कुटुंब हिंदुत्वासाठी झटणारं कुटुंब असून मी ही राजकीय भेट घेत असल्याचं स्पष्टीकरण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मोहोळ कुटुंबाची भेट घेण्याचपूर्वीच दिलं आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडालीयं. या हत्येनंतर आज नितेश राणे पुण्यात दाखल झाले आहे. या दौऱ्यात ते मोहोळ कुटुंबियांची भेट घेणार आहेत. मोहोळ कुटुंब हे हिंदुत्वासाठी झटणारं कुटुंब असून ही राजकीय भेट घेत आहे. यामध्ये चुकीचं काय आहे, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं नितेश राणे यांनी केलं आहे.

Exit mobile version