Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना थेट (Uddhav Thackeray) आव्हान दिले. मला संजय राऊतला एक प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करायची. हेमंत सोरेन (Hemant Soren) कसे झुकले नाहीत याबद्दल सामनाचा अग्रलेख लिहायचा पण दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने (उद्धव ठाकरे) पूर्ण कोकण दौऱ्यात ज्या पद्धतीने मोदीजींचे गुणगान गाण्यास सुरुवात केली त्यामुळे काही दिवसांपासून अप्रत्यक्षणे मी तुम्हाला सांगत आहे की उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या पूर्ण तयारीत आहे. दिल्लीत उद्धव ठाकरेंचे कोणते सहकारी अमितभाईंच्या घराबाहेर आणि मोदीजींना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे याची पुराव्यांसह माहिती मी काही दिवसांत देणार आहे, असे आमदार राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. राणे पुढे म्हणाले, मी आजही उद्धव ठाकरेंना आव्हान करतो दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या की मी भाजपबरोबर पुन्हा युती करण्यासाठी आतुर नाही आहे हे शिवसैनिक आणि महाराष्ट्राला सांगून टाका. एका बाजूला टीका करायची दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली असो, भारतीय जनता पार्टीचे उंबरठे झिजवताहेत. पायावर डोकं ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत याबद्दलही महाराष्ट्राला माहिती मिळाली पाहिजे.
Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर; राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
आम्हीही ठाकरे गटाच्या नेत्यांचे अल्बम टाकू
महाराष्ट्रात गुंडाराज आहे असे संजय राऊत म्हणतात तर मग संजय राऊत आणि निलेश पराडकर या गुंडाचे काय संबंध आहेत याबद्दलही थोडं विश्लेषण करावं. जर फोटो टाकण्याचे सत्र ट्विटरवर सुरू करत असाल तर मग आदित्य ठाकरेंबरोबरचे या निलेश पराडकरचे फोटो, संजय राऊतच्या बसलेला निलेश पराडकर याचा एक अल्बमचा आम्ही बाहेर काढू असा इशारा नितेश राणे यांनी ठाकरे गटाला दिला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या काळात वाढल्या आहेत. तरीही मोदी काहीच बोलत नाहीत असे राऊत म्हणाले होते. यावर राणे यांनी शरद पवार यांचे नाव घेत राऊतांना उत्तर दिले. शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना राज्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याचेही आकडे महाराष्ट्राला दिले तर महाराष्ट्राच्या ज्ञानात थोडी भर पडेल असा खोचक टोला राणेंनी लगावला.
महाविकास आघाडीचा पोपट मेला
महाविकास आघाडीच्या जागावाटपावर बोलताना नितेश राणे म्हणाले, महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. जागावाटपात यांचा काहीच ताळमेळ नाही. जागावाटपात काँग्रेसला किती जागा मिळत आहेत आणि उबाठाला कशी भीक दिली जात आहे हे येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसेल. त्यामुळे यांनी कितीही आव आणला तरी काहीच फरक पडणार नाही.
मला संजय राऊत म्हणा पण नितेश राणे म्हणू नका; रोहित पवार असं का म्हणाले?