मला संजय राऊत म्हणा पण नितेश राणे म्हणू नका; रोहित पवार असं का म्हणाले?
MLA Rohit Pawar Speak On Nitesh Rane : राज्यात सध्या राजकारणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यातच भाजपकडून सध्या आमदार नितेश राणे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधताना दिसत आहे.नुकतेच त्यांनी आमदार रोहित पवार यांचा उल्लेख संजय राऊत असा केला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, एकवेळ तुम्ही मला संजय राऊत म्हणा मात्र नितेश राणे म्हणून नका ही माझी विनंती आहे. मला भीती होती की मला कोणी नितेश राणे म्हणतंय की काय. मात्र मला याचा अभिमान आहे की मला कोणी नितेश राणे म्हणाले नाही, अशा शब्दात आमदार पवार यांनी राणेंच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
कर्जत येथे सद्गुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्जत – जामखेडचे आमदार रोहित यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टिपण्णी करत निशाणा साधला होता. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, एकवेळ तुम्ही मला संजय राऊत म्हणा मात्र नितेश राणे म्हणून नका ही माझी विनंती आहे.
‘आधी तुमच्या गळ्यातल्या गुलामीच्या पट्ट्याची काळजी करा’; राऊतांचा शिंदेंवर पलटवार
पुढे बोलताना पवार म्हणाले, मला भीती होती की मला कोणी नितेश राणे म्हणतंय की काय. मात्र मला याचा अभिमान आहे की मला कोणी नितेश राणे म्हणाले नाही. आज राज्यात राजकारणाची पातळी ढासळण्यात काही अंशी नितेश राणे तुम्ही देखील जबाबदार आहे. यामुळे तुम्ही कोणाबरोबर देखील माझे नाव जोडा मात्र माझे नाव तुमच्याबरोबर जोडू नका असा शाब्दिक टोला आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना लगावला आहे.
Chandrayaan-3 : याला म्हणतात भारतीय संस्कृती! झोमॅटोने ISRO ला पाठवली खास डिश
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?
आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले होते की, रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे राहुल गांधी आहे. प्रत्येक पक्षाचा एखादा पप्पू असतो तर काँग्रेसचा पप्पू राहुल गांधी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पप्पू हा आदित्य ठाकरे आहे. व सुळे गटाचा पप्पू हा रोहित पवार आहे. जशा पद्धतीने संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाला संपवण्याचे काम सुरु ठेवले आहे तसंच रोहित पवार यांनी सुळे गट संपवण्याची सुपारी घेतली आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.