Mla Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) आणि बीडमधील जंगलराजवरील फोकस तुम्ही वळवू नका, प्राजक्ता माळीचा विषय संपला असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी स्पष्ट केलंय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप करताना धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. या विधानावर प्राजक्ता माळीने आक्षेप घेत माफी मागण्यास सांगितलं. एवढचं नाही तर महिला आयोगात चारित्रहननाची तक्रारही दाखल करण्यात आलीयं. त्यावर बोलताना सुरेश धस यांनी आपण जे झालंय, त्याला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही ठणकावून सांगितलंय.
देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..
आमदार सुरेश धस म्हणाले, आता प्राजक्ता माळी यांचा विषय संपलेला आहे. माध्यमांनी तो विषय घेतला की मी बोलणार नाही. जे काही झालं आहे त्याला मी सामोरं जाण्यास तयार आहे. या प्रकरणी माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि बीडमधलं जंगलराज याच्यावरील फोकस दुसरीकडे वळवू नका, बीडमध्ये माजलेली दादागिरीवर बोला तुम्ही मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सायंकाळी पाचपर्यंत देत असल्याचं आमदार धस यांनी सांगितलंय.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल विधान केल्यानंतर प्राजक्ताने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी प्राजक्तासोबत तिचं कुटुंबियदेखील हजर होतं. प्राजक्ताच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नसून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
जी माहिती मिळाली ती लगेच बीड पोलिसांना पाठवली; अंजली दमानिया यांचा देशमुख हत्या प्रकरणात मोठा दावा
वाल्मिक कराड अन् त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध…
वाल्मिक कराडच्या अटकेच्या मुद्द्यावरुन आज सकाळीच माझ्याकडे काही माध्यमांची प्रतिनिधी आले होते. त्यावेळी मी सांगितलं की मी सर्वच माध्यमांच्या समोर बोलणार आहे. जोपर्यंत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे वाल्मिक कराडला अटक झाली की हे सांगितलं जात नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केला आहे.
पिस्तुलासाठी शिफारसी करणाऱ्या आमदारावरही कारवाई करा…
बीडमध्ये ज्या लोकांच्या पिस्तूल परवान्यासाठी आमदाराने शिफारसी केल्या असतील, त्याने आपलं पद भाड्याने दिलं असेल, त्या सर्व शिफारसी ऑन आणि ऑफ रेकॉर्ड तपासाव्यात. मी जरी शिफारस केली असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. मी आयुष्यात फक्त दोनच शिफारस केलेल्या आहेत. माझ्याकडेही अनेक लोकं लाडं-लाडं पिस्तूल मिळण्यासाठी येतात, त्यांनी मी धुडकावून लावतोय. मी स्वत;ला कधी बंदुक मागितली नाही इतरांना कसं देऊ, त्यामुळे पिस्तुलासाठी शिफारसी करणाऱ्या आमदारावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीयं.