Narayan Rane News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता कोकणामधून एक मोठी समोर आलीयं. भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतलीयं. निवडणुकीत सलग दोनवेळा पराभवाचा सामना पत्करावा लागलेल्या निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासाठी नारायण राणेंकडून लावणं सुरु असल्याचं समोर आलंय.
“खलनायकाला लाजविल असं त्यांचं कृत्य, त्यांचं खरं रुप..”, मुश्रीफांचं घाटगेंना व्याजासह उत्तर
निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणासह राज्याच्या राजकारणात सुरु आहे. कारण कुडाळ मतदारसंघ हा जागावाटपामध्ये शिंदे गटाला सुटणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे यांच्या उमेदवारीसाठीच नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
मनमौजी मराठी चित्रपटातून उलगडणार नात्यांची रंजक गोष्ट, नोव्हेंबरमध्ये योणार प्रेक्षकांच्या भेटीला
मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार राणे यांच्यात बुधवारी वर्षा बंगल्यावर बराच काळ चर्चा झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत तोडगा निघाला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आलीयं. कुडाळ मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीला खासदार राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत राऊत यांना चांगलच मताधिक्य मिळालं होत. कुडाळ-मालवण मतदारमधून नारायण राणे यांना 79 हजार 513 मते तर राऊतांना 53 हजार 277 मते मिळाली होती.
ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक! सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार; ज्येष्ठ नेत्याचा दावा..
दरम्यान, कोकणातील भाजपचे नेते म्हणून निलेश राणे यांची ओळख आहे. ते भाजपचे माजी खासदार आणि दिग्गज राजकारणी आहेत. पंधराव्या लोकसभेत निलेश राणे लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी त्यांचा 2014 व 2019 साली पराभव केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळ-मालवणमधून चांगलीच मते मिळाली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांची गोळाबेरजेत फरक पडणार एवढं मात्र नक्की.