Narayan Rane on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वेगात (Maharashtra Elections 2024) वाहत आहेत. महायुतीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी मविआने जोरदार प्लॅनिंग सुरू केलं आहे. मतदारसंघांची चाचपणी अन् जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीत दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. जागाावाटप असो किंवा उमेदवारांची निवड या कशावरच अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र नेते मंडळींच्या वक्तव्याने राजकारण तापलं आहे. भाजप खासदार नारायण राणे यांच्या (Narayan Rane) वक्तव्याने महायुतीतील घटक पक्षांना चांगलंच अस्वस्थ केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.
भाजपला राम-राम करत माजी आमदार रमेश कुथेंचा जय महाराष्ट्र; पाच वर्षांनी पुन्हा बांधल शिवबंधन
गुरुवारी राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) महाराष्ट्रातील भाजप खासदारांशी (Maharashtra) संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकांचाही आढावा घेतला. या पार्श्वभुमीवर नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य सूचक इशारा मानले जात आहे. भारतीय जनता पार्टीने राज्यातील 288 मतदारसंघांत उमेदवार द्यावेत असं मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. वरिष्ठ नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राणे म्हणाले.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार जागावाटपाच्या चर्चांसाठी दिल्लीत गेलेले असताना राणे यांनी असे वक्तव्य करणे हा कोणत्या दबावतंत्राचा भाग आहे का अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यावर शिंदे आणि अजित पवार गटाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
एका ढ विद्यार्थ्याने अर्थसंकल्पावर ज्ञान पाजळणे हास्यास्पद; नितेश राणेंचा राऊतांना टोला
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी भाजपला मोठा धक्का देत अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (shivsena) चांगलं यश मिळालं असून, महाविकास आघाडीने तब्बल 31 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. त्यामध्ये, ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातही इनकमिंग सुरू असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुतारी’ हाती घेतली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत.