Download App

Sujay Vikhe : राम शिंदेंच्या नाराजीवर बोलताना विखेंनी आवरतं घेतलं; म्हणाले, माझी भूमिका…

Sujay Vikhe Speak On Ram Shinde : राम शिंदे आणि विखे पिता-पुत्र हे भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य वारंवार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. कारण नुकतचं राम शिंदे यांनी एक खंत व्यक्त केली आहे. शिंदे म्हणाले होते की, मी विखे यांच्या विरोधात अनेकदा पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र मला थांबण्यास सांगितलं असल्याची खंत भाजप आमदार राम शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. (bjp mp sujay vikhe patil speak on bjp mlc ram shinde controversy)

सुजय विखेंनी लोकसभेसाठी बाळासाहेब थोरांताना ललकारलं; अहमदनगरमध्ये होणार चुरशीचा सामना?

राम शिंदेंच्या या नाराजीबद्दल अहमदनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुजय विखे यांना विचारले असता. त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी खासदार विखे म्हणाले की, मी या अगोदर देखील सांगितले आहे की, शिंदे साहेबांच्या विषयावर मी कोणतीही टिपण्णी करणार नाही. ते मला संयुक्तीक वाटत नाही. माझ्या त्यांच्याबद्दलच्या ज्या काही भावना आणि भूमिका असेल ती मी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करेल. अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार विखे यांनी दिली.

राम शिंदे नेमके काय म्हणाले होते?

अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले, विखे यांच्या संदर्भामध्ये मी पक्षातील वरिष्ठांकडे यापूर्वीही तीन वेळा तक्रारी केलेल्या होत्या. जे काही झालं ते मी स्पष्टपणे पक्षाला सांगितलेलं होतं. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

New Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार? पाहणी करताना शिंदेंनी व्यक्त केली ‘मन की बात’

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांनी या संदर्भामध्ये मला थांबायला सांगितलं. मी आत्तापर्यंत दोन वेळा थांबलेलो आहे. आता तिसऱ्यांदा सुद्धा थांबायला मी तयार आहे असे देखील शिंदे म्हणाले आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, मी थांबलोय पण आता त्यांच्याकडून सुद्धा तशी अपेक्षा आहे. असे बोलत शिंदे यांनी मनातील खंत मात्र कायम असल्याचेही स्पष्ट केले.

Sujay Vikhe : समनापूरमधील दगडफेकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया; ‘म्हणाले ही दंगल…’

मी याबाबत आधी ज्या तक्रारी केल्या आहेत त्याचा निर्णय प्रलंबित आहेत आणि एकाच पक्षात असल्याच्या नंतर वारंवार असे प्रसंग कोणावरही येऊ नये. भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त आहे त्या शिस्तीचे पालन केलं पाहिजे. असे तर प्रसंग कोणाच्याही समोर येणार नाहीत असेही आमदार राम शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. यावर बोलताना आज शिंदे म्हणाले, मी वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थितीजण्य जे काय झालं ते पक्षाकडे दिल. पक्षाकडे दिल असताना पक्षाने ते ऐकूनही घेतलं त्यामुळे त्याच्याकडून कोणतंही प्रत्युत्तरही काही आलेले नाही. त्यामुळे मी जो दावा केला आहे तो खराच आहे, असे म्हणतच शिंदे यांनी विखेंवर निशाणा साधला.

Tags

follow us