Download App

बेजबाबदार अधिकाऱ्याचा कळस; बारमध्ये बसून फाईलवर सह्या, अधीक्षकांनी उचललं मोठ पाऊल

  • Written By: Last Updated:

Gadchiroli Officer Suspended : शासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणे वागतात हे सांगणारी (Gadchiroli) एक बातमी समोर आली आहे. नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे.

हा अधिकारी नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा अधिकारी दारू पीत होता. त्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान तो अधिकारी चामोर्शी येथे उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या निलंबनाच्या आदेशाचे शासनाचे पत्र गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले.

PM मोदींमध्ये इंदिरा गांधींएवढी हिंमत असेल तर, डोनाल्ड ट्रम्प यांना खोटे ठरवा; राहुल गांधींचं थेट चॅलेंज

बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स क्लिअर करण्याचं काम सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. याच प्रकरणाचा आता सीसीटीव्ही पुरावाही समोर आला आहे. सीसीटीव्हीत दिसणारी सरकारी फाईल्स या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा अधिकारी या फाईल्स नागपूरच्या कीर्ती बारमध्ये घेऊन बसल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

या सगळ्या प्रकरणात चौकशी सुरू झाली. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us