Download App

भाजपला पैशांची गरज म्हणून त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद हवं, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल 

Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये सध्या पालकमंत्री पदावरून धुसफुस सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (18 जानेवारी) रात्री राज्य सरकारने

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये सध्या पालकमंत्री पदावरून धुसफुस सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (18 जानेवारी) रात्री राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती मात्र त्यानंतर महायुतीमध्ये (Mahayuti) अनेक नेते नाराज झाले असल्याची चर्चा सुरु आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिक (Nashik) जिल्ह्याची जबाबदारी सरकारने भाजप (BJP) नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे दिली होती मात्र त्यानंतर काही तासांमध्येच त्यांची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सरकारने स्थगित केली. त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरु झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तर दुसरीकडे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकचा पालकमंत्री भाजपचा असावा असे वक्तव्य केले होते आता यावर कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार टीका करत भाजपला पैशांची गरज असावी म्हणून तिथे आपला पालकमंत्री ठेवून नाशिकच्या कुंभमेळामध्ये डुबकी लावून घ्यावी असं भाजपला वाटत असावं अशी टीका केली आहे. नागपूर येथे आज विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार, त्याची कोणतीही मोजदाद केली जाणार नाही. भाजपला पैशांची गरज असावी म्हणून तिथे आपला पालकमंत्री ठेवून नाशिकच्या कुंभमेळामध्ये डुबकी लावून घ्यावी असं भाजपला वाटत असावं, म्हणूनच बावनकुळेंनी नाशिकचा पालकमंत्री भाजपचा असावा असे वक्तव्य केले असावे. असं माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले.  तर लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

2100 रुपयांचे वचन पूर्ण करू शकणार नाही

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की,सर्व बनवाबनवी व बोगसगिरी आहे. पीएम किसान योजनेमधूनही लोकांना असेच बाहेर केले, आता फक्त 1 लाख 10 हजार लोकांना तो निधी मिळतो आहे. काही दिवसांनी तो 60 हजार पर्यंत खाली येईल आणि अशी स्थिती लाडकी बहीण योग्य संदर्भात होईल आणि अर्ध्या अधिक महिलांचे नाव वगळले जातील, नवीन अटी शर्ती लावून महिलांची नावे कमी केली जाते.  2100 रुपयांचे वचन ते पूर्ण करू शकणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बदला घेण्यासाठी तयार राहावं आणि मतदानाने या राक्षसांचा नायनाट करावा अशी आम्ही बहिणींना विनंती करतो. असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

तर संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बीड येथील सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणात  सध्या तपासाची दिशा योग्य आहे असे मी मानतो मात्र त्यासाठी विलंब झाला, कारण त्यात लोकप्रतिनिधी सहभागी होते. बीडमध्ये गुंडगिरीला बळ मिळून निर्दोष व्यक्तींना आपला जीव गमावावा लागला, आता हे सर्व मुळासकट उखडून टाकण्याची गरज आहे तरच बीड स्वच्छ होईल.

Suresh Dhas : आका म्हणाले, पकडू नका; धसांनी जुनं खून प्रकरण उकरून काढत टाकला नवा बॉम्ब…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी दिली, मात्र पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितली असती, तर नवीन प्रकरण उजेडात आले असते – सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच दिसून येत आहे. सुरेश धस वेगळं म्हणतात, अजित पवार वेगळं म्हणतात, या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे हात एवढे गुंतलेले असताना कारवाई करण्यासाठी दिरंगाई का केली जात आहे? हा प्रश्न निर्माण होत आहे. बीड म्हणजे भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न आहे. अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

follow us