Download App

काँग्रेसचे मोठे नेते संपर्कात, पण अशोक चव्हाण…बावनकुळेंनी आता थेट सांगून टाकले

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule On Ashok Chavan-सोलापूरः काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात असून ते आमच्याबरोबर येण्यास तयार असल्याचे भाजपचे नेते सांगतात. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेही संपर्कात असल्याचे अनेकदा भाजप नेत्यांकडून सांगितले. अशोक चव्हाण हे भाजपमधील येतील, असा दावा नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा दावा खोडून काढला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोलापूर दौऱ्यावर अशोक चव्हाण यांच्याबाबत थेट भूमिकाच जाहीर करून टाकली आहे.

SA vs IND : पहिल्याच दिवशी रबाडाने भारताची दाणादाण उडविली; केएलने एकतर्फी खिंड लढविली !

अशोक चव्हाण हे भाजपच्या संपर्कात असल्याबाबत बावनकुळे म्हणाले, अशोक चव्हाण हे भाजपमधील येतील याबाबत कुठलेही बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी कुणाही संपर्कात नाही आणि तेही संपर्कात नाहीत. नांदेडमधील काँग्रेसचे काही मोठे नेते संपर्कात आहेत. पण अशोक चव्हाण संपर्कात नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.


भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…

बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मोठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना 440 होल्टचा करंट लागणार आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तडे दिले, यामुळे तर पंतप्रधान मोदी हेच सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात हा विश्वास असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत आले आहेत.

महाविकास आघाडी काळात महाराष्ट्र थांबला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार अडीच वर्षे फेसबुक लाईव्हवर होते. थांबलेला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गतिमान करण्यासाठी एकनाथ शिंदे सोबत आले, तर अजित पवारांनी मोदीजींच्या सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला साथ दिली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मुठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना 440 व्होल्टचा करंट लावणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us