Download App

“उद्धव ठाकरेंना अनेक आजार, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली”; बावनकुळेंचं जशास तसं उत्तर

उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.

Image Credit: Letsupp

Chandrashekhar Bawankule replies Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. या टीकेला उत्तर देताना नेते मंडळी उद्धव ठाकरेंवर तुटून पडली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशी जळजळीत टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप ‘आरएसएस’वरही बंदी आणेल

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बावनकुळे दिंडोरी आणि नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास करत आहेत. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई लुटली त्यामुळे चोरांचे सरदार कोण आहेत हे राज्याने पाहिले आहे असा टोला बावनकुळेंनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नसतं आणि ते जर काँग्रेसबरोबर गेले नसते तर त्यांना नैराश्य आलं नसतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली. मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे आता आपल्या उंचीपेक्षा जास्त बोलत आहेत असे बावनकुळे म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या मोदीजी नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तुम्ही तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार; बावनकुळेंनी चव्हाणांना सुनावलं!

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर बावनकुळेंनी भाष्य केलं. शरद पवारांना बारामतीत गल्लोगल्ली फिरावं लागलं. त्यामुळे बारामतीत त्यांचा पराभव होत आ आहे असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास करत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई लुटली असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज