Sudhakar Badgujar : उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का देत भाजपने आपली पायमुळे रोवली आहेत. उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना सोबत घेण्यात भाजपला यश मिळालंय. गेल्या अनेक दिवसांपासून बडगुजर यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या अखेर मुंबईत आज बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झालायं. त्यामुळे आज सकाळपासूनच भाजपच्या बड्या नेत्यांकडून सुधाकर बडगुजर यांच्यासाठी स्तुतिसुमने गायली आहेत, हेच नेते आधी बडगुजर यांच्याविरोधात आगपाखड करीत होते.
…पण धीरूभाईंच्या मागे ईडी नाही लागली; ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा अजित पवारांना टोला
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा करुन दिल्यानंतर आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपकडून पक्षप्रवेशाचं धुमशान सुरु आहे. त्यातच आज बबन घोलप, सुधाकर बडगुजर यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश केलायं.
काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमचा साथीदार असलेला सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते. बडगुजर यांचे कुत्तासोबत संबंध असल्याचा थेट आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी बडगुजर हे उद्धव ठाकरे गटात होते. पक्षफुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहिले. पण पक्षात सन्मान होत नसल्याचा आरोप करीत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलायं. त्यांनी आता आपल्या हाती कमळ घेतलंय.
Video : छातीवर पिस्तुल ठेवून म्हणाली, इतक्या गोळ्या घालीन की… तरुणीचा व्हिडिओ व्हायरल
बडगुजर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान, अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या आहेत. सुरुवातीला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ही दुपारी 2 वाजताची देण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार मंत्री गिरीश महाजनांसह इतर भाजप नेते कार्यालयात पोहोचले खरे पण चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे पोहोचलेच नाहीत. अखेर अनेकांना फोन केल्यानंतर बावनकुळे आणि चव्हाण हे पक्ष कार्यालयात आले. आज पक्षप्रवेश होणार याची कल्पना नव्हती आम्हाला वाटलं उद्या प्रवेश होणार या शब्दांत बावनकुळे यांनी आल्यानंतर सारवासारव केली. विशेष म्हणजे याच बडगुजर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊच्या कसिनोमधील फोटो समोर आणला होता. त्यामुळे बावनकुळेंच्या अडचणी वाढल्या होत्या.
बडगुजर हे ठाकरे गटात असताना अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्तासोबतचा पार्टीमध्ये डान्स करतानाचा फोटो भाजपने समोर आणला होता. हाच फोटो दाखवत नितेश राणे यांनी विधानसभेत गोंधळ केला होता. त्यावेळेस गृहमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, आता भाजपप्रवेशामुळे सुधाकर बडगुजर हे पवित्र झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.