Download App

गुजरात जिंकणाऱ्या नेत्याच्या मुलीचा गावात पराभव…

जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची गड आला पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. कारण त्यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपप्रणित उन्नती पॅनेलचा विजय झाला. भाजप प्रणित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी पाटील यांच्या कन्येच्या पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव केला.

जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीत भाविनी पाटील यांनी भाजपच्या विरूध्दच आपले ग्रामविकास पॅनेल उभे केले. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष होते. यामध्ये भाविनी पाटील या एकट्याच विजयी झाल्या. त्यांचे संपूर्ण पॅनल पराभूत झाले. तसेच, त्यांच्या ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवासुध्दा पराभूत झाल्या. या ठिकाणी भाजपप्रणित उन्नती पॅनलच्या चंद्रकला रघुनाथ कोळी या सरपंचपदी निवडून आल्या.

भाविनी पाटील या गेल्या वेळी मोहाडी गावच्या सरपंच होत्या. मात्र यावेळी त्यांनी भाजपप्रणित उन्नती पॅनेललचा आव्हान दिले. उन्नती पॅनेलचे प्रमुख शरद पाटील होते. गेल्या पाच वर्षांत गावात जी हुकूमशाही होती, त्याला जनतेचा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया देताना शरद पाटील म्हणाले, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला. गेल्या 5 वर्षांत गावाने जी हुकूमशाही पाहिली, त्याचा आता अस्त झाला आहे.

Tags

follow us