Download App

भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच अन्… , आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray : भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच असतो त्यानंतर भाजप हिंदूंना फेकून देते अशी टीका युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच असतो त्यानंतर भाजप हिंदूंना फेकून देते अशी टीका युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर केली आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच असतो त्यानंतर भाजप हिंदूंना फेकून देते. जर याबाबत उदाहरण द्याचे असेल तर गणपती बाप्पाबाबतच आहे. मागच्या सरकारच्या वेळी 2022 किंवा 23 साली सरवणकर जे शिंदेंचे आमदार होते त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणून गोळी चालवली मात्र तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री आहे ते सांगतात की गोळी चालवली पण कोणी चालवली हे आम्हाला माहिती नाही. त्याचा आता अभ्यास चालू आहे. खरं तर सरवणकरांवर यूएपीए कायदा लागू झाला पाहीजे होता. मात्र स्वतःला हिंदुत्वादी मानणाऱ्या या सरकारने सरवणकरांना सिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple) न्यासेचा अध्यक्ष केलं होतं असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या एक दिवसाआधी भाजपच्या काही ट्रोल्सनी चालवलं होतं की वक्फ बोर्डने (Wakf Board) सिद्धिविनायक मंदिराची जागा मागितली. एकीकडे तुम्ही गणपती विसर्जनाच्या मिरवणूक बंदूक रोखणाऱ्या व्यक्तीला न्यासेचे अध्यक्ष करतात आणि दुसऱ्या बाजूला मत मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगतात की वक्फ बोर्डनेही जागा मागितली आहे. असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच भाजपची दुटपी हिंदुत्वादी भूमिका जगजाहीर आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण ऐकत आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर हिंसाचार होत आहे. मात्र याच भाजपच्या बीसीसीआयने (BCCI) बांगलादेशला बोलवून भारतीय संघासोबत भारतात क्रिकेट खेळवत आहे. भाजप गेल्या 10 वर्षांपासून फक्त बांगलादेशच्या विषयावर राजकारण करत आहे असा आरोप देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.

अर्थव्यवस्था, नोकरी अन् सुरक्षा, एआय समिटमध्ये मोदींनी दिला ‘गुरुमंत्र

follow us