मुंबईत रस्ते स्कॅम अन् झोपडपट्टीवर ‘अदानी’ कर; बजेटवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

मुंबईत रस्ते स्कॅम अन् झोपडपट्टीवर ‘अदानी’ कर; बजेटवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

Aditya Thackeray on Mumbai Budget : मुंबई महापालिकेचा 74 हजार 427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्यानंतर सत्ताधारी सरकारकडून अर्थसंकल्पाची प्रशासना केली जात आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई नगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर आणि केंद्रातील अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

>जेलमध्ये भेटायला वेळ नाही अन् सुटकेनंतर चव्हाणला कडाडून मिठी; मंत्री शिरसाटांचा अदित्य ठाकरेंना टोला

यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, केंद्राच्या बजेटमध्ये सुद्धा महाराष्ट्रला काही मिळालं नसून भाजप कडून मुंबईची पिळवणूक होत आहे. महापालिका बजेटवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी एका शायरीचं उदाहरण म्हटली. बहुत हैं मगर खुलासा कौन करे, मुस्कुरा देता हूँ यूँ ही तमाशा कौन करे..!!आज सोशल मीडियावर ही शायरी वाचली, जी बजेटनंतर तंतोतंत बरोबर वाटत. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार खात्याचे सचिव

तसेच आजच्या अर्थसंकल्पात झोपडपट्टी दुकानावर कर लावला जाणार असल्याचं म्हटलं आहे . ही धक्कादायक बाब आहे . झोपडपट्टीतील दुकानावर कर लावला जाणार हाच अदानी कर आहे. कारण धारावीतून दुकान यामुळे खाली होतील . कारण त्यांच्यावर कर लावला जातोय . आज झोपडीतील दुकानावर कर लावला जात आहे. आता लवकरच झोपडपट्टीतील घरावर सुद्धा कर लावला जाईल . हा अदानी कर नाही तर काय ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

Sweden Firing : मोठी बातमी! स्वीडनमधील शाळेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

कचरा संकलनवरसुद्धा कर लावण्याचा प्रस्ताव आहे. देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करायला मुंबई महापालिका खर्च करणार आहे. कारण ती जमीन अदानी प्रकल्पला दिला जाणार आहे. अदानीचा साडे ७ हजार कोटी रुपयाचा प्रीमियम अजून महापालिकाला भरला नाही. त्याचा उल्लेख यामध्ये नाही. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ‘२०२३ मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि रस्त्याचा घोटाळा होणार सांगितलं होतं . आणि तेच तंतोतंत घडतय. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होते २ वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करू .
फक्त २६ टक्के रस्त्याच काम पूर्ण झालय हे समोर आलय . रस्ते स्कॅम झालाय , आणि शिंदेंच्या निर्णयाला आयुक्तानी एक्सपोज केलय . त्यामुळे MSRDC ४ हजार कोटी मुंबई महापालिकेला देणार आहे का ? नगरविकास खात उपमुख्यमंत्रीकडे असेल तरी आम्ही त्याच्यात पारदर्शकता आणावी अशी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube