फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार खात्याचे सचिव
Maharashtra IAS Transfer List : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 13 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दराडे (Pravin Darade) यांची देखील बदली करण्यात आली आहे.
प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि वस्त्रोद्योग खात्याच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. तर राज्यपालांचे सचिव म्हणून डॉ. प्रशांत नरनावरे (Dr. Prashant Naranaware) यांची बदली करण्यात आली आहे. याचबरोबर राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांची नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
जाणून घ्या कोणाची बदली कुठे झाली?
1. प्रवीण दराडे यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
2. पंकज कुमार यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. नितीन पाटील सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4. श्वेता सिंघल राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. डॉ. प्रशांत नरनावरे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. अनिल भंडारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7.पी.के.डांगे आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
8. एस. राममूर्ती , सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. अभिजित राऊत जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. मिलिंदकुमार साळवे सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
11. राहुल कर्डिले सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. माधवी सरदेशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Sweden Firing : मोठी बातमी! स्वीडनमधील शाळेत गोळीबार, पाच जणांचा मृत्यू
13. अमित रंजन सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.