Brutal murder of BJP office bearer along with his brother in Bhiwandi, serious allegations against Pawar’s MP Suresh Mhatre : गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी आणि त्यातही विशेषत: निर्घृण हत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अशामध्ये नुकतेच एक धक्कादायक घटना ठाण्यातील भिवंडी येथून समोर आली आहे. भिवंडीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची त्याच्या सहकाऱ्यासह कार्यालयाच्या बाहेरच धारदार शस्त्राने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये शरद पवार पक्षाचे खासदार सुरेस म्हात्रे यांचं नाव चर्चेला आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ…
तत्त्वांसाठी मरण्यासही तयार! संगमनेरच्या विराट मोर्चातून बाळासाहेब थोरातांची थरकाप उडवणारी घोषणा
भिवंडीतील खर्डी येथे सोमवारी 11 ऑगस्टच्या रात्री भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी यांची कार्यालयाच्या बाहेरच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तांगडी हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. या प्रकरणामध्ये विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यातील विकी म्हात्रे हा शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे.
धक्कादायक, ताटात उष्टे अन्न ठेवल्याने मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या
त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी म्हात्रेंवर आरोपींना सोडवण्यास मदत केल्याचे गंभीर आरोप करत या हत्येप्रकरणी या पितापुत्रांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात यावेत अशी मागणी कऱणारे पत्र पोलिसांना दिले आहे. तसेच त्यांनी ही केस फास्टट्रॅकवर चालवत लवकरात लवकर मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील या कुटुंबाने दिला आहे.
मला डोळे मारणाऱ्या सर्व महिला वकिलांना अनुकूल आदेश मिळाले; SC चे माजी न्यायमूर्ती काटजूंची पोस्ट
दरम्यान या हत्यांमुळे खर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या व्यावसायिक कारणांवरून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तसेच तांगडी हे भाजप पदाधिकारी असल्याने या हत्येचे राजकीय कनेक्शन देखील तपासले जात आहे. दुसरीकडे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांसह आणखी दोन ते तीन जण तसेच हल्ल्यामध्ये जखमी झालेला धीरज तांगडी याची देखील चौकशी सुरू आहे.
तसेच या अगोदर देखील प्रफुल्ल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते ताज हॉटेलमध्ये गेले असताना घरी परतल्यानंतर त्यांना ऑफिसला बोलवण्यात आले होते. तसेच ते नेहमीपेक्षा जास्त वेळ तेथे थांबले होते. याची देखील चौकशी करण्याची मागणी तांगडी कुटुंबाने केली आहे.
‘पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या’, खासदार लंकेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
दरम्यान या प्रकरणावर माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी देखील गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार असताना 2021 मध्ये तांगडी यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यावेळी दोषींवर ठोस कारवाई झाली नाही. त्यावर तेव्हा कारवाई झाली असती तर ही हत्या टाळता आली असती. तसेच या प्रकरणी आता पुढील कारवाई सुरू आहे.त्यामुळे मंडळी सर्वसामान्या जनतेचे प्रश्न अनुत्तरीत असताना सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय संबंध असणाऱ्या अशा प्रकारच्या हत्यांबाबत तुम्हाला काय वाटतं?