कर्जबाजारीपणाला कंटाळून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या; विष प्राशन करण्यापूर्वीचा Video व्हायरल

कर्जबाजारीपणाला कंटाळून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या; विष प्राशन करण्यापूर्वीचा Video व्हायरल

नेवासा : अहमदनगर जिल्ह्यातील  नेवासा तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४४) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी (ता. १७) आत्महत्या केली. विष प्राशन करण्यापूर्वी बाबासाहेब सरोदे यांनी स्वतःचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धक्कादायक, ताटात उष्टे अन्न ठेवल्याने मुलाकडून वडिलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या 

बाबासाहेब सुभाष सरोदे कर्जाची परतफेड करण्याची चिंता आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तणावाखाली होते. अखेर १७  ऑगस्टला कर्जबाजारीपणामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.  या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. बाबासाहेब यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत त्यांनी  व्यथा आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट केलं. या व्हायरल व्हिडिओमध्ये सरोदे म्हणाले, मी अल्पभूधारक शेतकरी आहे. या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर, भरवशावर मी जिवंत होतो. आज-उद्या कर्जमुक्ती होईल या आशेनं मी जिवंत होतो. भाजप सरकार दोनदा सत्तेत आलं. फडणवीस साहेब हे दोनदा मुख्यमंत्री झाले. पण, बोलल्याप्रमाणं त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन पाळलं नाही. माझी आज आशा संपलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगून गेले, धर्मांधाने अधिक पिळले, धनवंताने अधिक छळले, क्रुर झाले साव… तसं हे सरकार झालेलं आहे, असं सरोदे म्हणाले.

मला डोळे मारणाऱ्या सर्व महिला वकिलांना अनुकूल आदेश मिळाले; SC चे माजी न्यायमूर्ती काटजूंची पोस्ट 

पुढं ते म्हणाले, पुढं ते म्हणाले, अर्थव्यवस्था आमच्यासाठी नाही, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाही, तर उद्योगपतींसाठी आहे. या सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही, म्हणून मला आत्महत्या करायची वेळ आलीये. योग्य वेळी मला सरकारकरडून मदत झाली असती तर नक्कीच मी माझं आयुष्य जगलो असतो. पण, आता माझा आत्मविश्वास संपला आहे. कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. फडणवीस साहेब, आपलं अस्तित्व सिध्द करायचं असेल तर जीवंत माणसाला तर मरावं लागतंय, म्हणून मी हा निर्णय घेत आहे. या जिवंत जगात जगायचं असेल तर पैशाशिवाय दुसरं काही लागत नाही. जिवंतपणी मला मदत नाही झाली, आता मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबाला आणि कोणी कर्जबाजारी शेतकरी बांधव असतील तर त्यांनी मदत करा, अशी आर्त विनवणी सरोदेंनी केली.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केलीये. तर शेतकरी नेते आणि स्थानिकांनी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांसाठी ठोस धोरणे राबवण्याची मागणी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube