Download App

माझ्याबद्दल ब्र काढाल तर चप्पल बोलेल; Vidhan Parishad साठी हितेंद्र ठाकूरांनी सर्व पक्षांना ठणकावले

Hitendra Thakur यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सह सर्वच पक्षांना थेट इशारा दिला आहे.

BVA Hitendra Thakur Warn for Vidhan Parishad : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Election 2024) निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. यामध्ये बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार असल्याने निवडणूक होणार आहे. त्यात तीन मतदान असलेल्या बहुजन विकास आघाडीचे (BVA) अध्यक्ष हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी याच पार्श्वभूमीवर भाजप सह सर्वच पक्षांना आपल्यावर घोडेबाजाराचा आरोप केल्यास माझी चप्पल बोलेल असा थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले हितेंद्र ठाकूर ?

या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे. यामध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. त्यात पालघरमधील बहुजन विकास आघाडीकडे तीन मतं आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वच पक्षाचे नते आम्हाला भेटत आहेत. मात्र गेल्या वेळी आम्ही योग्य उमेदवारांना मतं दिली. त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. भाजपचे नाही.

विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेणारा ‘डंका… हरीनामाचा’चा ट्रेलर प्रदर्शित!

त्यामुळे भाजपने जरी आमची त्यांच्याशी युती असल्याचं लोकांची दिशाभूल करण्यासाठी सांगत आहे. तर आम्ही भाजपला समर्थन देत असल्याचं दावा खोटा आहे. नाही तर आम्ही उमेदवारच उभा केला नसता. आम्ही योग्य उमेदवाराला पाठींबा देऊ. माझ्यावर कोणीही दावे करू नये. घोडेबाजाराचा आरोप कोणत्याही पक्षाने करू. 1990 पासून माझ्याबद्दल कोणीही ब्र काढलेला नाही. अन्यथा माझी चप्पल बोलेल. जो विकासास मदत करेल त्याच्या सोबत आम्ही असू असं म्हणत हितेंद्र ठाकूरांनी भाजप सह सर्वच पक्षांना थेट इशारा दिला आहे.

IND vs ZIM सामन्यातील पराभवावर थरूरांचा टोला; म्हणाले, 4 जून असो वा 6 जुलै अहंकाराला…

महायुतीला फाटाफुटीचे टेन्शन : त्यामुळे मतांची फाटाफूट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. संख्याबळाचा विचार केला तर भाजप 103, शिंदे गट 39, अजित पवार गट 40 असे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या पाच उमेदवारांना विजयासाठी 115 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. म्हणजेच 12 मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे 9 आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे आणखी तीन मते मिळवणे महायुतीसाठी अशक्य नाही.

जम्मू-कश्मीरमध्ये दहवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद; अकोल्याच्या मोरगाव भाकरे गावावर शोककळा

शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. या उमेदवारांनाही विजयासाठी सात अतिरिक्त मते मिळवावी लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी दहा अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांंनाही अतिरिक्त मते मिळवण्यासाठी जास्त तजवीज करावी लागणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

Horoscope Today: आजचे राशी भविष्य 7 जुलै 2024, या राशीच्या लोकांनी नोकरीत सावधानतेने पाऊल उचला

मविआचं संख्याबळाचं गणित : काँग्रेसचे 37 मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त राहतील. आता ही 14 मते ठाकरे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. काँग्रेसची ही मते मिळाली तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार मिलींद नार्वेकर निवडून येतील अशी परिस्थिती आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचाही अर्ज आहे. परंतु, त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे फक्त एकच मत आहे. शरद पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे. शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत. याशिवाय सपा आणि माकपाची तीन मते जयंत पाटलांना मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागणार आहेत.

follow us