Chandrasekhar Bawankule : लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गट नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटात सामील होणार असल्याचा दावा वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी केला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) भाष्य केलं.
Ajit Pawar भोळा माणूस त्या स्वभावामुळेच ते फसले; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा टोला
महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे आमदार परत उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत. विशेष म्हणजे, असा विचार करणेही मुंगेरीलाल के हसीन सपने म्हटले पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना आजही दिवास्वप्न पडते, याचेच आश्चर्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्कृष्टपणे सरकार चालवत आहेत. एवढ्या चांगल्या सरकारमधील आमदारांना परत जाण्याची कोणतीही गरज नाही. आमदार परत जाणार नाही, असं बावनकुळे म्हणाले.
शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा
यावेळी बावनकुळेंनी जागावाटपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, भाजपाने २० जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांचा प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. ५१ टक्के मते कशी मिळतील यासाठीचे नियोजन करणार आहोत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांर एकमत होईल, असं सांगितलं. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपाच्याच आहेत. त्यावर भाजप-महायुती एकत्र लढणार, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होतील, अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत आहे. राज ठाकरे जर येत असतील, तर त्यात वावगे काहीच नाही. दुसरं असं की, प्रकाश आंबेडकर हे आमच्या विचारांशी सहमत नाहीत, मात्र, राजकारणात कुणी पर्मनंट शत्रू अथवा मित्र नसतो, असं सूचक विधानही त्यांनी केलं.