Download App

BJP च्या विधानपरिषद उमेदवांराच्या यादीमध्ये ट्विस्ट, ‘ते’ लेटरहेड बनावट; बावनकुळेंची माहिती

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने 10 उमेदवारांची नावे फायनल केली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे लेटरहेड बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Written By: Last Updated:

Chandrasekhar Bawankule : विधानपरिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने (BJP_ 10 उमेदवारांची नावे फायनल करून हायकमांडकडे पाठवल्याचे वृत्त समोर आले होते. या दहा उमेदवारांची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या लेटरहेडवर होती. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे लेटरहेड बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

आमदारकी जाताच बजोरिया पित्रा-पुत्रांनी घेतली ठाकरेंची भेट, पक्षात घेण्यास स्पष्ट नकार.. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी मिळणार? याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशात आज या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्राकडे 10 नावे पाठवल्याची वृत्त आले होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या लेटरहेडवर दहा उमेदवारांची यादी होती. या दहा नावांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, आता हा कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं समोर आलं आहे. आपल्या नावाचे बनावट लेटरहेड बनवून कुणीतरी मुद्दाम हा खोडसाळपणा केल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.

IND vs SA 2024 : भारतासह आफ्रिकेचाही टेन्शन वाढणार, फायनलमध्ये धो धो पावसाचा अंदाज! 

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी संभाव्य नावे टाकून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लेटरहेडचा वापर केला जात आहे. ते लेटरहेड अधिकृत नाही. या अनधिकृत लेटरहेडचा वापर करून संभ्रम पसरवला जात असल्याचे भाजपने म्हटले आहे.

या लेटरहेडवर विधान परिषदेसाठी 10 नावांचा उल्लेख होता. यात पंकजा मुंडे, अमित गोरखे, परणिय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक यांची नावे होती.

 

दरम्यान, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. यामध्ये भाजप 5 जागांवर, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 2 जागा लढवणार आहेत, तर काँग्रेस एका जागेवर निवडणूक लढवू शकते.

follow us

वेब स्टोरीज