राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Chandrashekhar Bawankule News : महायुतीचं सरकार राज्यात मजबूत असून विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत, त्यामुळे राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकीनंतरच चित्र स्पष्ट केलंय. दरम्यान, पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आत्तापासून तयारी सुरु करण्यात येत आहे. मुंबईत ते बोलत होते.

लक्षवेधी प्रकरण पुन्हा पेटलं; दानवेंच्या पीएला तहसीलदाराने झापलं, वाचा AटूZ फोनकॉल संवाद

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात महायुती पक्की आहे, पुढील काळातही पक्कीच राहणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतू नाही. आमच्याकडून कधीच मोठा म्हणून लहान भावाला त्रास नाही. जे नेते काही बोलत असतील तर त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांना समज द्यायला हवी. भाजप महायुती भक्कम राहण्यासाठीच काम करीत आहे. आमची महायुती मजबूत असून ती मजबूतीने विधानसभेला सामोरं जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.

संजय राऊतांचं उत्तर देण्यासाठी वेळ नाही…
भाजप कधीच पळ काढू शकत नाही. या निवडणुकीत देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठामपणे उभी राहिलीयं. 2029 च्या निवडणुकीतही देशाची जनता मोठं पाठबळ एनडीएच्या मागे उभी राहणार आहे. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना माध्यमच महत्व देत आहेत. राऊतांचं बोलणं त्यांना लखलाभ असून त्यांनी काय बोलावं यामध्ये मी पडत नाही. राऊतांचं उत्तर देण्यासाठी वेळ नसल्याचा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलायं.

Assembly Election : कुणी मोठा अन् छोटा भाऊ नाही; मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे…
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, विस्तार करण्याचा पूर्ण अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्री शिंदे हे योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. राज्यातील भौगोलिक आणि 14 कोटी जनतेच्या फायद्यासाठी महायुतीतीतल तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना मंत्रिपदे मिळायला हवीत, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

राज्यात संघटनात्मक आमदारांच्या संख्येचा विचार करुन भाजप मोठा भाऊ म्हणून लहान भावाला समजून घेण्याच्याच भूमिकेत आहे. कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या पाहिजे, याबाबत केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार आहेत. ज्या त्या पक्षाचे नेते आपल्या नेतृत्वाला जागांबाबत मागणी करीत असतात किती जागा मान्य करायचा हा वरिष्ठांचा अधिकार आहे. कुठल्याही जागेसंदर्भातील चर्चा माध्यमांमध्ये मान्य होऊ शकत नाही, त्यासाठी तिन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन सन्मानजनक जागावाटप करावं आणि एकदिलाने आम्ही महायुती म्हणून सामोर जाणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज