आमदारकी जाताच बजोरिया पित्रा-पुत्रांनी घेतली ठाकरेंची भेट, पक्षात घेण्यास स्पष्ट नकार..

आमदारकी जाताच बजोरिया पित्रा-पुत्रांनी घेतली ठाकरेंची भेट, पक्षात घेण्यास स्पष्ट नकार..

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षफुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले माजी आमदार गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बजोरिया (Viplav Bajoria) यांनी आज उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. मात्र, ठाकरेंनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे.

IND vs SA 2024 : भारतासह आफ्रिकेचाही टेन्शन वाढणार, फायनलमध्ये धो धो पावसाचा अंदाज! 

विप्लव बजोरिया गुरुवारीच विधान परिषदेतून निवृत्त झाले. विधानपरिषदेचे आमदार म्हणून त्यांनी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, निवृत्तीनंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बजोरिया पित्रा-पुत्रांनी ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यांनी ठाकरेंची भेट घेत्याने शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे.

राज्याचे सहा लाख कोटींचे बजेट, पण राजकोषीय तूट एक लाख कोटींवर, पैसे कुठून आणणार ? 

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांना शिंदेकडीला आमदार तुमच्याकडे परत आल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा सवाल विचारला असता ठाकरेंनी आपण सोडून गेलेल्या आमदारांना परत पक्षात घेणार नाही, असं सांगितलं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत त्यांनी 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेलेले असताना पुन्हा 9 जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. हे. त्यामुळं ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, बजोरिया यांच्याबाबत ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचा संदेश दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज