Download App

पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, ते खरंय, पवार आणि ठाकरेंचा पक्ष संपणार…; बावनकुळेंचा मविआला टोला

पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या दोन पक्षांचा उल्लेख केला आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

Image Credit: Letsupp

Chandrasekhar Bawankule On MVA : दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं विधान केलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections) महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या वक्तव्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीला Mahavikas Aghadi) टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या दोन पक्षांचा उल्लेख केला आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

‘शरद पवारांचं राजकारण संपवणार’; अजितदादांनी खडसावलं पण चंद्रकांत पाटलांचं मौन! 

काल शरद पवारांनी अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं. तर त्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन पक्ष विलीन होतील, असं विधान केलं. त्यावर बोलतांन बावनकुळे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, ते खरं आहे. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील दोन पक्ष संपणार आहेत. एकूणच त्यांनी असं म्हणायचं होतं की, एक शरद पवार आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपणार आहे. त्यामुळे सध्या पक्ष विलीनीकरणाच्या गोष्टी सुरू आहेत. एकतर शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत विलीन होतील, नाहीतर शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण शरद पवारांना माहीत आहे की तुतारी काही वाजणार नाही. तुतारी बंद पडणार आहे, अशी खोचक टीका बावनकुळेंनी केली.

Air India Express Strike : … म्हणून एअर इंडियाचे कर्मचारी टाटांच्या विरोधात घेत आहेत सामूहिक रजा 

महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील या शरद पवारांच्या दाव्यावरही बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 30-35 जागा सोडा, शरद पवारांचा पक्ष सध्या विलीनीकरणाच्या स्थितीत पोहोचला आहे, असं बावनकुळे म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
आज महाराष्ट्रात सहा पक्ष आमने-सामने आहेत. दोन्ही बाजूला तीन-तीन. या लोकसभा निवडणुकीनंतर त्यातील दोन पक्ष लोप पावतील, त्यांचं कुठेतरी विलीनीकरण होईल अथवा त्यातली माणसं इकडे-तिकडे पळतील. पण, दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठं जातील, ते मी आत्ता सांगत नाही. पण दोन्ही पक्ष दिसणार नाहीत, असा दावा चव्हाण यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज