‘शरद पवारांचं राजकारण संपवणार’; अजितदादांनी खडसावलं पण चंद्रकांत पाटलांचं मौन!

‘शरद पवारांचं राजकारण संपवणार’; अजितदादांनी खडसावलं पण चंद्रकांत पाटलांचं मौन!

Ajit Pawar On Chandrakant Patil : बारामतीत शरद पवार यांचं राजकारण संपवणार म्हणणारे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी चांगलच खडसावलं. शरद पवार (Sharad Pawar) निवडणुकीत उभेच नव्हते तर संपवण्याची भाषा करणं योग्य नाही, या शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकार पाटलांवर प्रहार केलायं. आता अजित पवार यांनी खडसावून बोलल्यानंतर चंद्रकात पाटलांच्या वक्तव्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. पण चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगल्याचं दिसून आलं.

चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अजितदादा नाराज; म्हणाले, बोलणं चुकीचच..,

आपल्या विधानांमुळे नेहमीच चंद्रकात पाटील चांगलेच चर्चेत आलेले आहेत. काहीही असो ते आपली भूमिका रोखठोकपणे मांडत असतात. यावेळी मात्र, अजित पवार यांनी खडसावल्यानंतर त्यांनी बोलणं टाळलंय. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या निवासस्थानी ते आले होते. ते निवासस्थापासून निघत असतानाच माध्यमांनी त्यांना अजित पवारांनी खडसावल्याबद्दल प्रश्नांची विचारणा केली. मात्र, कुठलाही प्रतिसाद न देता चंद्रकांत पाटील तेथून निघून गेल्याचं दिसून आले आहेत.

‘राम मंदिर’, ‘वारसा कर’ अन् ‘चायनीज-आफ्रिकन’; पित्रोदांचा ‘इतिहास’ही काँग्रेसला घायाळ करणाराच..

बारामती लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापत असतानाच भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाकडे चांगलाच फोकस केला होता. भाजपच्या अनेक नेत्यांसह चंद्रकांत पाटलांनी मॅरेथॉन बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकांनंतर त्यांनी बारामतीतून शरद पवार यांचं राजकारण संपवण्याचं भाजपचं टार्गेट असल्याचं विधान केलं होतं. त्यावेळी त्यांच्या या विधानची म्हणावी तशी चर्चा झाली नाही पण आता हा मुद्दा बाहेर आला आहे. कारण अजित पवार यांनी त्यांना या विधानावरुन चांगलचं खडसावून बोलले आहेत.

अधर्माच्या आधारावर राम मंदिराचे काम, सत्तेत आल्यावर मंदिराचे शुद्धीकरण करू; पटोलेंचे मोदींना प्रत्युत्तर

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकातदादा :
शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केलं होतं, त्याला काहीही अर्थ नव्हता. तुम्ही पुण्यात काम पाहा मी बारामतीत पाहतो, असं मी त्यांना म्हणालो होतो. चंद्रकात पाटलांनी असं बोलायला नको होतं. जर शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर त्यांचा पराभव करण्याचा विषयच येत नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीचं असून असं बोलायला नको होतं, या शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकात पाटील यांना खडसावलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज