राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? वाचा, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले
Prithviraj Chavan on NCP : अनेक प्रादेशिक पक्ष येत्या काही काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय शरद पवारांच्या भाकीतावर नाना पटोलेंचं मोठं विधान
निकालावर अवलंबून असेल
शरद पवार यांनी अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा त्यांच्यासोबत जातील असं वक्तव्य केलं असलं, तरी हे वक्तव्य येत्या 4 जून म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. तसंच, शरद पवारांनी जे काही मत व्यक्त केलं आहे ते सर्व येत्या राजकीय समीकरणावर अवलंबून आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
तरच काँग्रेसमध्ये विलीन होतील
शरद पवार यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची जी चर्चा केली आहे ती मुलाखत 4 मे रोजी साताऱ्यात झाली आहे. त्यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच, त्यांच्या वक्तव्याचा विचार केला तार 4 जून रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं आणि काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली तरच अनेक पक्ष काँग्रेस सोबत येतील किंवा थेट विलीन होतील असंही चव्हाण म्हणाले आहेत.
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांचं विधान अन् चर्चांना उधाण
पवार काँग्रेस विचारांचेच
यावर बोलताना शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही. शरद पवार काँग्रेस विचारांचेच आहेत. सध्याच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतात, पश्चिम महाराष्ट्रात किती जागा मिळतील यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील असंही चव्हाण म्हणाले.