Chandrashekhar Bavankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आज पुण्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बंडाच्या चर्चा काहीशा थंडावल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी पुन्हा एकदा बंडाच्या चर्चांवर अजित पवार यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी पुन्हा सांगितलं की, ‘त्या शंका-कुशंका डोक्यातून काढू टाका. मी गेल्या 30-32 वर्ष राजकारणात आहे. कधी दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतील तर काही जण इकडे काही जण तिकडे जात असतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. तसं काही नाही.’असंही यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
‘त्या शंका-कुशंका…’ बंडाच्या चर्चांवर अजित पवार पुन्हा म्हणाले…
या प्रकरणावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. याअगोदर देखील बावनकुळेंनी अजित पवारांच्या भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना नकार दिला होता. तर आता बावनकुळे म्हणाले की, ‘विकास आघाडीचे नेतेच अजित दादांना बदनाम करतात. दादांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अजित दादा मलाही भेटले नाहीत. कोणत्याही वरिष्ठांना भेटलेले नाहीत. ते भाजपच्या कोणाच्याही संपर्कात नाही.’ त्यामुळे आता भाजपकडून देखील या चर्चांना पुर्ण विराम देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे मात्र शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, गुण जुळले की वेळ पुन्हा येईल असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एकदिवस आधी काहीशा थंडावलेल्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.