Download App

Chandrashekhar Bawankule : ‘काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं नाही’; बावनकुळेंकडून टीकाकारांचा समाचार

Chandrashekhar Bawankule On Women’s Reservaiton : तब्बल 12 वेळा संसदेत महिला आरक्षण विधेयक आणूनही काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं नसल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे, त्यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यावर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महिला आरक्षण विधेयक 2024 लोकसभा निवडणुकीला लागू होणार का ?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे नेते नेहमची भ्रम निर्माण करीत असतात. त्यामध्ये नाना पटोले यांचा समावेश आहे, काँग्रेसच्या काळात संसदेत महिला आरक्षणाचं विधेयक 12 वेळा येऊनही काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं नाही, जनतेला काही देता येत नाही, म्हणून काँग्रेसचे नेते भ्रम निर्माण करीत असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

पडळकरांना आवर घालावा नाही तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरू; अमोल मिटकरांचा थेट इशारा

तसेच विरोधकांकडून कायमच आम्ही मुंबई तोडणार असल्याचा आरोप केला जात आहे, पण मुंबई कदापिही तोडली जाणार नाही, विरोधकांना महिला आरक्षण देता नाही आलं म्हणून ते असा आरोप करीत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.

पीएम मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा, युवका कॉंग्रेसने कापला बेरोजगारीचा केक

संसदेच्या अधिवेशनात आज महिला आरक्षणाचं विधेयक सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक असून देशातल्या महिलांना 33 टक्के आरक्षण मिळालंय, आता 21 व्या शतकात आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी संसदेचा आजचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या ‘या’ खास कर्ज योजनांबद्दल तुम्हाला माहित आहे का?

काय म्हणाले वडेट्टीवार?
महिला आरक्षणासंदर्भात लोकसभेत विधेयक आणले गेले. परंजु या विधेयकाचा गाजावाजा, त्याचे उदो उदो करण्यात आले आहे. सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना प्रतिनिधित्व मिळेल असे वाटत असताना नव्या जुमल्याला समोर जावे लागले. मताचे राजकारण किती घाणेरडे असू शकते हा नवा पायंडा राजकारणात बघायला मिळत आहे. या विधेयकाची संसदेत घोषणा केली. पण प्रत्यक्षात 2026 मध्ये जनगणना होईल. त्यानंतर 2029 मध्ये अंमलबजावणीची भूमिका होईल. आता त्याचा गाजावाजा करत आहेत. त्यामुळे भाजपा हा एक नवीन जुमला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांचा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजुर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, मात्र, विरोधी पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेससह आपने महिला आरक्षणाच्या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

Tags

follow us