Download App

‘जागरूक राहा, आपण चुकलो तर जनता’.. शरद पवारांचा आघाडीच्या नेत्यांना इशारा

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, सध्या संवादाचा अभाव आहे. मोठ्या नेत्यांचं संसदेत येणजाण नसतं. प्रमुखांचं दर्शन झालं असतं तर बर वाटतं. नवीन वास्तू गरजेची आहे का, हा प्रश्न आहे. पण, सरकारने कुणाशीच चर्चा न करता निर्णय घेतला. कुणी हरकतही घेतली नाही.

Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, काही जण परदेशात”; ठाकरेंच्या दौऱ्यावर अजितदादांचा खोचक टोला

संसद भवनाच्या उद्घाटनाचे राष्ट्रपतींना निमंत्रण द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती. पण, ती स्वीकारली गेली नाही. त्यामुळे मग आम्हीही त्या कार्यक्रमाला जायचं नाही असं ठरवलं. पण कार्यक्रम झाला त्याचं मला मोठं आश्चर्य वाटलं. स्वातंत्र्यलढ्यानंतर पहिली पार्लमेंटची बैठक झाली त्याचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. पहिले सत्र झाले त्यानंतर मंत्रिमंडळाचा एक फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये त्यावेळचे दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते.

त्यानंतर आताचा दुसरा एक फोटो होता. नव्या संसदेच्या वास्तूचे उद्घाटन आणि प्रधानमंत्री. भगवे कपडे घातलेले संत. मला त्यांची नाव माहिती नाहीत. हा त्यांचा फोटो होता. म्हणजे संसदेत प्रवेश करण्याची पहिली संधी निर्वाचित सदस्यांना मिळाली नाही तर या सगळ्यांना मिळाली. ठीक आहे तुम्ही निर्णय घेतला. कुणाशीही चर्चा न करता घेतला. कुणी हरकतही घेतली नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सर्वसामान्य नागरिकांवर माझा विश्वास आहे. राजकारणी चुकले की ते मार्ग दाखवतात. इंदिरा गांधींसारख्या जबरदस्त नेत्यांचा पराभव जनतेने केला. ज्याच्या हातात सत्ता दिली, त्यावेळी जबाबदारी पार पाडली नाही म्हणून मोरारजी देसाई यांची सत्ता गेली. लोकं शहाणपणाचे निर्णय घेतात.

संसद भवनाचा ‘तो’ फोटो पवारांना खटकला; जुन्या फोटोचा दाखला देत मोदी सरकारला फटकारलं

ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तेथेही त्यांनी सत्ता हातात घेतली. गोवा हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे आता आपल्याला सावध होण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विश्वासदर्शक निर्णय घेतले तर लोक पर्याय बदलतील. मात्र आम्ही चुकलो तर वेगळा पर्यायही लोक स्वीकारू शकतात, असा इशारा पवार यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिला.

Tags

follow us