Chhagan Bhujabal : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील सवाल केला. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. एकनाथ शिंदे तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेले. मात्र त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं की, मी शपथ घेतली मराठा समाजाला आरक्षण देईल. ती शपथ पूर्ण झाली. मात्र संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाल असेल तर मग मागासवर्ग आयोग आता जे काम करतय ते सर्व्हेक्षण कशासाठी आहे? असं भुजबळ म्हणाले आहेत.
Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर सत्ता हिसकावून घ्या; अहमदनगरमधून पडळकरांचा हल्लाबोल
भुजबळ म्हणाले की, 27 तारखेला गुलाल उधळला तर मग आता उपोषण कशासाठी? तसेच याला अध्यादेश म्हणजे काय? हे कळत नाही आणि हे म्हणतात आम्हाला आरक्षण मिळाले. आता उपोषण करणार आहेत तर हे घे जीआर. मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या ताटामधले नको मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेले मात्र त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं की मी शपथ घेतली. मराठा समाजला आरक्षण देईल ती शपथ पूर्ण झाली.
पंढरपूरला जरांगेंनी एका अपंग मुलाला फाशी दिली, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप
मग आता मागासवर्ग आयोग आता जे काम करतय ते कशासाठी आहे? सर्वेक्षणाचा खटाटोप कशासाठी सुरु आहे? बंगला असला तरी झोपडी अस खोटं कशासाठी सांगता जामखेडमध्ये सगळे कुणबी खोटे दाखले तयार केले जात आहेत. मराठा कुणबी लिहायच तर मराठी कुणबी अस लिहिलं जात आहेत. सगळं खोटे रेकॉर्ड तयार केले जात आहे. ज्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातोय. अशा पद्धतीने दाखले दिले जातील तर सगळे मराठा हे कुणबी होऊन जातील.
Chhagan Bhujbal यांच्या मागे खंबीर उभे राहा अन् हा राग इलेक्शनमध्ये काढा; जानकारांचे ओबीसींना आवाहन
आरक्षण नाही मिळाल तरी मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती द्या अशी मागणी ते करत आहे. मराठा समाजाला जर सवलती देत असाल तर ब्राह्मण, जैन यांना देखील द्या फक्त मराठा समाजालाच का? असा माझा सवाल आहे. नाभीक समाजातील एका व्यक्तीने माझ्या समर्थनात पोस्ट टाकली. तर मराठा समाजाने त्याच्यावर बहिष्कार टाकला. याच्या दुकानात जाऊ नका म्हटले. त्यामुळे माझं न्हावी समाजाला आवाहन आहे. त्यांनी मराठा समाजाची भादरू नाही. त्यांची त्यांना त्यांच्यातच भादरू द्या, हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्रात असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.