Chhagan Bhujbal Ministership In Maharashtra New CM Government : राज्यात नव्या सरकारचा (Maharashtra CM) 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या मंत्रिपदी वर्णी लागू शकणाऱ्या संभाव्य नेत्यांची नावं समोर आली आहेत. दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी घातलेल्या कोटची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. सध्या राजकीय वर्तुळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोठं मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. तसेच भुजबळांनी आज घातलेल्या कोटची देखील चर्चा सुरू आहे.
भाजपकडून सत्तेची खेळी, दाल में कुछ काला है… अंजली दमनिया यांचा गंभीर आरोप
छगन भुजबळ यांनी आज घेतलेल्या कोटवर एक मुश्किल टिप्पणी देखील केलीय. मंत्रिमंडळ नाही तर नाशिकच्या थंडीमुळे कोट घातला असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. नाशिकपासून (Nashik) पुढे गेल्यानंतर कोट काढून टाकणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, सरकार स्थापन होईल कुणालाही अस्वस्थ होण्याची गरज नाही. राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या यादीवर बोलताना ते म्हणाले की, हे सगळं अंदाज आहे. आमचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आहेत, ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरं आहे.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या कोटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. भुजबळांना नव्या सरकारमध्ये मोठं मंत्रिपद मिळणार, अशी शक्यता वर्तवली जातेय. #ChhaganBhujbal #MaharashtraCM #MaharashtraGovernment #Nashik pic.twitter.com/Y4YI38SauZ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 3, 2024
Ram Satpute : मारकडवाडीच्या मतदानाआधी राम सातपुतेंचा धमाका; ऑडिओ क्लिपमध्ये काय?
जितेंद्र आव्हाडांवर बोलताना भुजबळ म्हणाले की, ते त्यांच्या पक्षाचे गटनेते आहेत म्हणून बोलत आहेत. सरकार स्थापनेला याआधी देखील 1 महिना उशिरा झालेला आहे. जेव्हापासून महाराष्ट्र राज्य निर्माण (Maharashtra Politics) झालंय, तेव्हापासून ही पध्दत आहे. 132 आमदार आहेत, त्यांना पण लोक निवडायचे आहेत. पंतप्रधान आणि अमित शहा एका कॉन्फरन्समध्ये होते, म्हणून वेळ गेला. कुणालाही अस्वस्थ होण्याची गरज नाही. राज्यात सगळेजण आपापलं काम करत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मंत्रिपदांबाबत काही कल्पना नसल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली, तेव्हा स्ट्राईक रेटबाबत विषय झाला. एक नंबर भाजप आहे, तर दोन नंबरला आम्ही आहोत. नवीन चेहऱ्यांना संधी नेहमी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहेत. दर वेळी 160 असतात यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मानसन्मान राखला जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.