Download App

Video : आमदार वैभव नाईक संतापले, सिनेस्टाईल ऑफिसची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Naik : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज

  • Written By: Last Updated:

Vaibhav Naik : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते मात्र अवघ्या आठ महिन्यानंतर आज (26 ऑगस्ट) हा पुतळा दुर्दैवानं कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात काही वेळेपूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. सध्या सोशल मिडियावर तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आज शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. याबद्दल आम्हाला दुःख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता मात्र ज्या वेळी याचा काम सुरु होते तेव्हाच स्थानिक लोकांनी कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या पण त्यांना दुर्लक्ष करण्यात आले आणि जे विरोध करत आहे ते आपल्या विरोधात आहे असा समज करून घेण्यात आला असं वैभव नाईक म्हणाले. तसेच 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही भाग ढासळला नाही पण सहा महिन्यांपूर्वी केलेले काम ढासळले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

बांगलादेशकडून पराभव अन् पाकिस्तानला ICC ने दिला मोठा धक्का, जाणून घ्या नेमकं प्रकरण

प्रकरण काय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला होता मात्र दुर्दैवाने आज हा पुतळा कोसळला. अद्याप हा पुतळा कसा कोसळला? याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

follow us