Eknath Shinde replies Uddav Thackeray : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेजारी राज्यात निवडणुका असल्या तरी महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. काल महाड येथे झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले.
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. कर्नाटकमध्ये प्रचारासाठी का आलो याचे कारणही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युती? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितलं दिल्लीत काय घडलं?
ते म्हणाले, मी भाजप-सेना युतीचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकात आलो आहे. केंद्र आणि राज्यात जसं डबल इंजिनचं सरकार आहे. तसंच कर्नाटकमध्येही पुन्हा डबल इंजिनचं सरकार यावं यासाठी मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला तुफान प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजप मोठ्या बहुमतानं जिंकणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी काल महाड येथे जाहीर सभेत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत. लाज वाटायला पाहिजे. बोंबलून झालं असेल. हिंमत असेल तर मिंध्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला हरवा असे आवाहन लोकांना करायला पाहिजे. मात्र त्यांची जाहिरात कन्नडमध्ये येते असं म्हटलं होतं. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देत तुम्ही कर्नाटकात एखादी सभा घेऊन दाखवावीत, असे आव्हान दिले.
‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’