Download App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्नेहभोजनाला अजित पवारांची दांडी, नाराजीच्या चर्चांना उधाण

  • Written By: Last Updated:

अजित पवारांसह (Ajit Pawar) अनेक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीससोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रीपदंही मिळाली. मात्र, शिंदे गटाच्या आमदारांना अद्याप मंत्रिपदं मिळाली नाही. अजित पवार सत्तेत आल्यानं शिंदे गट अस्वस्थ आहे. मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. शिंदे-पवारांत कोल्डावार सुर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले. मात्र, अजित पवारांनी या स्नेहभोजनाला दांडी मारली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना स्नेहभोजनासाठी बोलावले होते. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हे जेवण देण्यात आले आहे. अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी दिलेले हे पहिलेच स्नेहभोजन होते.

मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, अशी आशा शिवसेनेच्या अनेक नेत्यांना होती. मात्र, अद्याप शिवसेनेच्या आमदाराना मंत्रिपद नाहीत. त्यामुळं आमदार नाराज आहेत. नाराज आमदार ठाकरे गटात जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहेत. तर भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिगणी पडत आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातही नाराजी आहे. दरम्यान, महायुतीत असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील मतभेद समन्वयाने आणि मिटवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. यातून मंत्रिमंडळ विस्तार, आमदारांची नाराजी, महायुतीतील धुसफूस शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांसोबत बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष या स्नेहभोजनाकडे लक्ष होतं.

‘गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार’; मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन 

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री भोजनासाठी वांद्रे येथे पोहोचले आहेत. मात्र, अजितदादा मुंबईत असताना देखील ते या स्नेहभोजनाला न गेल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. निमंत्रणाच्या एकतास विलंबानंतरही अजित पवार देवगिरी निवासस्थानीच असल्याचं समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अचानक वॉर रूमची बैठक घेऊन प्रकल्पांचा आढावा घेतला होता. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर हे अतिक्रमण झाल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं सीएम शिंदे नाराज असल्याचंही बोलल्या गेलं. दरम्यान, आता स्नेहभोजनाला दांडी मारल्यानं अजित पवार नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांना भोजनाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. खुद्द आमदार बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. मात्र, आपल्याला त्या स्नेहभोजनाचे निमंत्रण नसल्यानं आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us