‘गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार’; मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

‘गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार’; मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. अहमदनगरमधील शिर्डीमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ अभिनयाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ वितरण करण्यात आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

विखेंच्या पराभवासाठी ठाकरे गट सरसावला; नगरच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक

मुख्यमंत्री म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे‌. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत, शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये आज शरद पवारांचा ‘आवाज’; मुंडेंची साद,’साहेब कामाच्या माणसाला’…

तसेच सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे‌. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये, यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube