विखेंच्या पराभवासाठी ठाकरे गट सरसावला; नगरच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
Sujay Vikhe : नगर शहरातील भाजपचे खासदार सुजय विखे यांचा कसा पराभव करता येईल तसेच नगर व शिर्डी लोकसभेसाठी कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यातच नुकतेच अहमदनगरच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या.
बीडमधील जुनी फळी शरद पवारांसोबतच! व्यासपीठावर माजी आमदारांची गर्दीच गर्दी
राज्यात आगामी काळात निवडणुका असल्याने आता सर्वच पक्षातील नेतेमंडळी पदाधिकाऱ्यांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागल्या. दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेक राजकीय गणित आता बदलली आहे. यामुळे प्रत्येक पक्षाकडून स्वपातळीवर आपली ताकद अजमावून पहिली जाऊ शकते असे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे. यातच आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेची (ठाकरे गट) एक महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली. विशेष म्हणजे नगरचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
परळीत मुंडेंना पर्याय सापडला? 700 गाड्यांसह शक्तिप्रदर्शन करत शिलेदार पवारांच्या गटात
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने सध्या मातोश्रीवर दररोज वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहत आहे. तसेच ठाकरे यांच्याकडून त्यांना सूचना दिल्या जात आहे. नुकतेच नगरच्या पदाधिकाऱ्यांसमवते उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. नगर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना काही सूचना केल्या. तसेच पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे यांचा पराभव करायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
या बैठकीत नगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढायच्या तसेच लोकसभेच्या दृष्टीने नगर व शिर्डीसाठी कोणता उमेदवार सक्षम राहील याबाबत चर्चा झाली. या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे. त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे. विखेंचा पराभव करायचा असल्याने तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.