Download App

लाडक्या बहिणींना 2100 कधीपासून मिळणार? अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, ‘…पुढच्या महिन्यात’

CM Devendra Fadanvis On Ladki Bahin Yojana : राज्यात आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर (Mahrashtra Budget 2025) झालाय. अजित पवार यांनी कृषी, उद्योग क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी वाढणार, यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. त्यानंतर लाडक्या बहि‍णींना 2100 रूपये हप्ता कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला जातोय. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी देखील महायुती सरकारला (Maharashtra Politics) घेरलंय. जाहिरनाम्यात केवळ थापा मारल्या, दहा हजार वर्षातील सगळ्यात बोगस अर्थसंकल्प अशी टीका देखील विरोधक करत आहेत. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं विधान केलंय.

‘गेल्या 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प …’, उद्धव ठाकरेंचा CM फडणवीसांना खोचक टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या निधीची रक्कम कमी केलेली नाही. प्रत्येक पात्र असलेल्या महिलेला पैसे मिळणार आहे. जेव्हा कोणतीही योजना करताना एक गृहितक धरलं जातं. त्यानंतर योजनेला अंतिम रूप येतं. उदाहरनार्थ तीन कोटींचं गृहितक ठेवून एखादी योजना बनवली, अन् ते गृहितक जर 2 कोटी 70 लाख रूपयांमध्ये पूर्ण झालं तर तेवढे पैसे वाचतात. योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडल्यास जुलै, डिसेंबर महिना आहे. यासाठी आवश्यक तरतूद आपण करून ठेवली आहे.

3 ऑक्टोबर रोजी दरवर्षी साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
लाडक्या बहि‍णींना योजनेंचा हप्ता 2100 रुपये कधीपासून मिळणार? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की, यासंदर्भात नक्कीच आमचं काम सुरू आहे. परंतु अर्थसंकल्पाचा समतोल राखणं देखील महत्वाचं आहे. घोषणा केलीय ती पूर्ण देखील करायची आहे. योजना दिर्घकाळ चालवण्यासाठी आर्थिक तरतूद करणं देखील गरजेचं आहे. समतोल राखतंच पुढे जायचं आहे. लाडक्या बहि‍णींना 2100 रूपये घोषणा केल्यानंतर त्याच्या पुढील महिन्यापासून मिळणार आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये मात्र पंधराशे रूपयेच महिलांना मिळणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

 

follow us