VIDEO : राज्यातील वीजदर कमी होणार, अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा

VIDEO : राज्यातील वीजदर कमी होणार, अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra budget 2025 electricity rates down : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी मांडला. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मिळालेले यश दाखवलं. यासाठी अजित पवारांनी लाडक्या बहि‍णींचे देखील आभार (Maharashtra budget 2025) मानले.

अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणी मिळाल्या आणि आम्ही धन्य झालो. बारा कोटी प्रियजणांना मान्य झालो. विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी राज्यातील विजदरासंदर्भात (electricity rates) देखील मोठी घोषणा केलीय.

Maharashtra Budget LIVE : “लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो”, अजितदादांचा अनोखा अंदाज

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना मोठा दिला मिळालेला आहे. येत्या पाच वर्षामध्ये राज्यातील वीजदर कमी होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे.

ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. ⁠यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील. अजित पवार यांनी राज्यात होणारी गुंतवणुकीचा आढावा देखील अर्थसंकल्पीय भाषणात घेतला आहे.

औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करू, अजितदादांची मोठी घोषणा

अजित पवार म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होतेय. देशी आणि परदेशी गुंतवणुकीत शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे वाढ होत आहे. त्यामुळे रोजगार वाढत आहे. सोबतच उत्पन्नात वाढ होतेय. येत्या काळामध्ये 15 लाख 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. सोबतच राज्यात येत्या काळात 16 लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube