Maharashtra Budget LIVE : अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर, वाचा कुणाला काय मिळालं?

Maharashtra Budget LIVE : अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर, वाचा कुणाला काय मिळालं?

Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आमलकी एकादशीचा पवित्र दिवस अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे माझं भाग्य आहे. “लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो. पुन्हा आलो” अशा शब्दांत अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Mar 2025 03:06 PM (IST)

    दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करणार

    यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल.  मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे.
    मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

  • 10 Mar 2025 03:02 PM (IST)

    आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार : अजित पवार

    उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

    पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणी

    दोन टप्प्यातील काम पूर्ण, सरकार आणखी 50 कोटी देणार

    छत्रपती संभाजी महाराजांच्या खुणा जिथं आहेत त्याचा खूणा संगमेश्वर येथे आहेत.

    संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार

    वढू तुळापूर येथे स्मारकाचं काम वेगानं सुरु

    हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचं यथायोग्य स्मारक

    चैत्यभूमी दादर , इंदू मिल येथे स्मारकास निधी पुरवण्याचं काम

    अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारक

  • 10 Mar 2025 03:02 PM (IST)

    राज्यस्तरीत कबड्डी, कुस्ती स्पर्धांच्या अनुदानात वाढ

    छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करुन ते प्रत्येकी 75 लाखावरुन 1 कोटी रुपये करण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 03:00 PM (IST)

    पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारणार

    पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. नळ स्टॉर- वारजे असा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार. दुसऱ्या टप्प्यातील दोन मेट्रो मार्गांसाठी ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे. पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा ्प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय.

  • 10 Mar 2025 03:00 PM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान

    सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने "नमामि गोदावरी" अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करुन त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

  • 10 Mar 2025 02:56 PM (IST)

    राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना

    राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून दर्यापूर - जिल्हा अमरावती, पौड, इंदापूर व जुन्नर - जिल्हा पुणे, पैठण व गंगापूर - जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी - जिल्हा वर्धा, काटोल - जिल्हा नागपूर, वणी - जिल्हा यवतमाळ, तुळजापूर - जिल्हा धाराशीव तसेच हिंगोली येथील न्यायालयांचा समावेश त्यात आहे.

  • 10 Mar 2025 02:55 PM (IST)

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी 36 हजार कोटी

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २३ हजार २३२ कोटी खर्च झाले आहेत. २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेत २०२५ -२६ मध्ये ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे.

  • 10 Mar 2025 02:53 PM (IST)

    बचतगटांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार

    नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे. बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक “उमेद मॉल” उभारण्याचे शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

  • 10 Mar 2025 02:51 PM (IST)

    अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ

    अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. याशिवाय आदिवासी घटक कार्यक्रमाच्या यादीत ४० टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. धनगर, गोवारी समाजासाठी २२ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या.

  • 10 Mar 2025 02:50 PM (IST)

    राज्यातील 24 लाख महिलांना लखपती दिदी करणार

    दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube