Download App

‘आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, आमचे संबंध…’; CM फडणवीसांच्या मनात नक्की काय?

उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झाली नाही. आमचे संबंध खूप खराब आहेत

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळाल्यानंतर भाजप (BJP) आणि ठाकरे गटाची (UBT) जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. तर आदित्य ठाकरे यांनीही आतापर्यंत तीन फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

अर्थ मंत्रालयाची मोठी घोषणा, अमेरिकन ChatGPT न वापरण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश 

उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झाली नाही. आमचे संबंध खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही. पण याचा अर्थ आम्ही जवळ घेतोय, असाही नाही, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, यावेळी त्यांना ठाकरे गट-भाजपच्या युतीविषयी विचारले असता ते म्हणाले की, निवडणुकीनंतर, उद्धवजी आणि माझी सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही. आमच्यातले संबंध कधीही समोर भेटल्यानंतर नमस्कार करता येणार नाहीत, असे नव्हते. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. आमचे संबंध चांगले आहेत. दक्षिण भारतात जसं नेते एकमेकांचे जान के प्यासे आहेत, तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. त्यामुळे संवाद साधायला, बोलायला काही हरकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

वाल्मिक कराडला ‘उच्च’ दिलासा! ईडी चौकशी होणार नाही… 

पुढं ते म्हणाले, आमच्यातले संबंध खूप खराब आहेत, अशी परिस्थिती नाही. पण याचा अर्थ आम्ही जवळ घेतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत, अशी परिस्थिती नाही, असं फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले, त्यादिवशी आमचे चंद्रकांतदादा उद्धव ठाकरेंना एका लग्नात भेटले. उद्धव ठाकरेंना सवय आहे की, भेटल्यावर काहीतरी मिश्किलपणे बोलणार. यानंतर हे काहीतरी बोलले. त्यावर लगेच अशा बातम्या झुाल्या की, जसं दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पायघड्या टाकलेल्या आहेत. तर असं नाहीये. आमच्यात संबंध आहेत, पण आम्ही त्यांना लगेच जवळ घेतोय आणि सत्तेत घेतोय, असं नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीबाबतही फडणवीसांनी भाष्य केलं. ते म्हणाले, साधारणपणे एकनाथ शिंदेंचा चेहरा हा गंभीर असतो. ते मुख्यमंत्री असतानाही त्यांचा चेहरा असाच गंभीर होता. प्रत्येकाची स्वतःची कार्यपद्धती असते, पर्सनॅलिटी असते, तशी त्यांची धीरगंभीर पर्सनॅलिटी आहे, असं फडणवीस म्हणाले.

follow us