Download App

खोटे बोलून शिवसैनिकांचा विश्वासघात केलेल्यांना जागा दाखवणार, CM शिदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंडाळी करून भाजपसोबत (BJP) जाऊन सत्ता स्थापन केली. आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर निवडणूक चिन्ह आणि पक्षही शिंदे गटाकडे गेला. दरम्यान, त्यांनी केलेल्या बंडामुळं त्यांच्यावर गद्दारीचा शिकला बसला. ठाकरे गटाने कायम शिंदे गटावर गद्दार अशी टीका केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसैनिकांचा विश्वासघात केला, त्यांना जागा दाखवणार, असा संकल्पही केला.

Aditya-L1 Mission : इस्त्रोनं रचला नवा इतिहास! आदित्य एल-1 ने गाठलं आपलं लक्ष्य 

आज शिव संकल्प अभियानात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसैनिक म्हटलं की, मिळेल ते काम करायचं ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यांनी लढाऊ बाणा दिली. अन्यायावर मात करण्याची, अन्यायाविरुध्द पेटण्याची ताकद दिली. त्यांच्या विचारांचा वारसा लक्षात ठेऊनच आपण पुढील काळात काम करणार आहोत.

खासदार नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

खोट्याच्या कपाळी गोटा
यावेळी त्यांनी खोट्याच्या कपाळी गोटा, असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी खोटे बोलून भाजप-शिवसेना युती तोडली, ज्यांनी खोटे बोलून आपल्याच लाखो शिवसैनिकांचा विश्वासघात केला. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठीचा हा संकल्प आहे, असं शिंदे म्हणाले.

शिवसेना जिवंत ठेवण्यासाठीच बंड
शिंदे म्हणाले, आपल्या पक्षात इनकमिंग सुरू आहे. आज मोठ्या संख्येने लोक पक्षात सामील होत आहेत. मी काही चुकीचे पाऊल उचलले असते तर असं झालं नसतं. सत्तेच्या लालसेपोटी काही लोक पक्ष सोडतात. पण, सत्तेच्या लालसेपोटी मी हा निर्णय घेतलेला नाही. पक्ष वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठीच मी ही भूमिका घेतली. मला पद आणि सत्तेचा मोह कधीच नव्हता. आजही नाही. मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्यासोबत सात-आठ मंत्री होते. आम्ही सर्वांनी सत्तेला लाथ मारली. शिवसेना जिवंत ठेवण्यासाठीच आम्ही हे सर्व केले, असं ते म्हणाले.

शिंदे म्हणाले, 2019 मध्ये भाजपसोबतची नैसर्गिक युती खोटे बोलून तोडली होती. त्यामुळं बंडाचा निर्णय तेव्हाच घेतला असता. कारण, आम्ही तसं काही केलं असतं तर रसातळाला गेली असती. म्हणून आम्ही तेव्हा तसा निर्णय घेतला नाही, असं शिंदे म्हमाले.

follow us