एकिकडे अजितदादा अन् दुसरीकडे एकनाथ शिंदे, ‘राष्ट्रवादीत सर्वाधिक त्रास मला होतोय’

एकिकडे अजितदादा अन् दुसरीकडे एकनाथ शिंदे, ‘राष्ट्रवादीत सर्वाधिक त्रास मला होतोय’

Jitendra Awhad : अजितदादांनी निर्माण केलेला दहशत आणि दराऱ्याचा मी बळी पडलो आहे. सध्या सर्वाधिक त्रास मला होतोय. एकीकडून अजित पवार (Ajit Pawar) आणि दुसरीकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. राष्ट्रवादीतील सर्वाधिक वाईट अवस्था माझी आहे आहे, अशी खंत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘टू द पॉईंट’ पॉडकास्टमध्ये व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुरु केलेल्या ‘टू द पॉईंट’ या पॉडकास्टच्या पहिल्या मुलाखतीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता दुसऱ्या भागात जितेंद्र आव्हाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या मुलाखतीचा ट्रेलर राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमधून जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
बाहेरच्यांनी द्रोह केला तर तो निपटून टाकता येतो. घरातल्या द्रोहाला करायचं काय? ज्यांनी साहेबांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी वाटाघाटी होऊ शकत नाहीत. दिल्लीला जेव्हा पवारसाहेब एकटे बसत असतील तेव्हा त्यांना हे विचार सतावत नसतील का? माझ काय चुकलं? कुठं चुकलो? ह्यांना काय कमी केलं? पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसतच नाही. साहेबांच्या चेहऱ्यावर दु:ख नाही याचा अर्थ त्यांना दु:ख होत नाही का? ते बोलून दाखवत नाहीत म्हणजे दु:ख होत नाही का? असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आव्हाडांनी पुण्यात येऊन अजितदादांना शिंगावर घेतले; आतापर्यंत त्यांची केवळ दादागिरीच !

ते पुढं म्हणाले की तुमचं कर्तृत्व महान आहे असं वाटतं, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे आहे असं म्हणता तर घ्या ना स्वतंत्र निशाणी, घ्या ना स्वतंत्र पक्षाचं नाव, जा जनतेसमोर. जनता ठरवेल काय करायचं ते. ज्या घराने सहा पदं दिली, ऐश्वर्य दिलं, नाव दिलं, सन्मान दिला. त्या घराला पाडताना, हातोडा मारताना काही वाटत नाही मग तुमच्याकडून काय अपेक्षा बाळगायच्या?

छगन भुजबळांच्या ओबीसी मोर्चावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली ते म्हणाले, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, भ्रष्टाचार, गोंधळलेलं सरकार या सर्व गोष्टी बाजूला रहाव्या म्हणून तर भुजबळांना सुपारी दिली आहे. भुजबळ बोलत नाहीत ते पोपट झालेत. हा संपूर्ण‘टू द पॉईंट’ मधील पॉडकास्टचा ‘एपिसोड 2’ येत्या 5 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता प्रसारित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube