Download App

‘काही लोकं आतल्या गाठीचे, फक्त टोमणे मारतात’; CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

Eknath Shinde Vs Udhav Thackeray : काही लोकं आतल्या गाठीचे असतात, फक्त टोमणे मारत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, मुंबईत आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

पाकिस्तानला दिला धोबीपछाड: आयसीसी क्रमवारीत गिल, कोहली, रोहितची झेप

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजकारणात मनमोकळे लोकंसुद्धा असतात, काही धाडस करणारे असतात. बाळासाहेब ठाकरेंचं 80 ,समाजकारण आणि 20 टक्के राजकारण मंत्र होता, पण नंतर ते उलट झालं. काही लोकं आतल्या गाठीचे असतात ते बोलत नाहीत फक्त टोमणे मारत असतात पण निलमताई गोऱ्हे तशा नाहीत, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेता लगावला आहे.

अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना पत्र लिहित शिंदे-फडणवीसांची तक्रार

तसेच निलमताईंचा राजकारणात मोठा प्रवास आहे, महिलांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात, पक्षात कोणी अन्याय करत असतील तर निलमताई त्याला बरोबर करत असतात, सभागृहात आम्ही मोजकंच बोलायचे त्यामुळे आमच्यामुळे निलमताईंना अडचण आली नाही जे आगाऊपणा करायचे त्यांना ते नीट करीत असल्याचं विधान शिंदे यांनी यावेळी बोलताना केलं आहे.

Jawan चित्रपटाच्या कमाईत घसरण; ६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

निलमताई आमच्या शिवसेनेत आल्या, त्यांच्यासोबत अनेकदा बोलणं होतं होतं, कोणीही असा निर्णय स्वत:हून घेत नाहीत, त्याला तशा पद्धतीचे कारणे असतात त्यामुळे तो निर्णय घेत असतो, निलमताई सत्तेत होत्या, सत्ता सोडण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आम्हीही 8-9 मंत्री होतो, लोकं सत्तेकडे जात असतात पण सत्तेतून पायउतार होण्याचं पहिलं उदाहरण संपूर्ण जगाने पाहिलं असेल, जे होईल ते होईल, अधिक विचार न करता आम्ही निर्णय घेतला आणि राज्यात जनतेला हवं ते सरकार स्थापन केलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us