पाकिस्तानला दिला धोबीपछाड: आयसीसी क्रमवारीत गिल, कोहली, रोहितची झेप
ICC ODI Ranking: आयसीसीने वनडे क्रिकेटमधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान गाठले आहे. त्याच्याशिवाय आणखी दोन भारतीय फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे.
जानेवारी 2019 नंतर प्रथमच तीन भारतीय फलंदाजांचा वनडे क्रमवारीतील टॉप-10 यादीत समावेश झाला आहे. शुभमन गिल व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा टॉप-10 रँकिंगमध्ये समावेश आहे.
शुभमन गिलने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली होती. त्याने 58 धावांची शानदार खेळी केली होती. ताज्या क्रमवारीत त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे.
रोहित शर्माने आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत, तर विराट कोहलीला पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या नाबाद 122 धावांच्या खेळीचा फायदा झाला आहे.
नाथाभाऊंची लोकसभा लढण्याची इच्छा : भाजपकडून रक्षा खडसेंची उमेदवारी कन्फर्म; लीडही जाहीर!
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि पाकिस्तानचेही टॉप-10 मध्ये तीन फलंदाज आहेत. कर्णधार बाबर आझम अव्वल आहे आणि गिलपेक्षा 100 गुण जास्त रेटिंग आहेत तर इमाम-उल-हक आणि फखर जमान अनुक्रमे पाचव्या आणि 10व्या स्थानावर आहेत.
या ताज्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तीन सामने आणि इंग्लंड-न्यूझीलंड मालिकेतील दोन सामन्यांच्या कामगिरीचाही समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा शेवटच्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावल्यानंतर अव्वल 10 च्या जवळ आहे. 21 स्थानांच्या झेप घेऊन तो 11 व्या स्थानावर आहे तर याआधी त्याचे सर्वोत्तम रँकिंग 25 वे होते.
Sonu Sood: सोनू सूद ठरला ‘मोस्ट स्टायलिश उद्योजक’
ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर चौथ्या स्थानावर, ट्रॅव्हिस हेड 20 व्या स्थानावर आणि मार्नस लॅबुशेन 45व्या स्थानावर यांनी प्रभावी प्रगती केली आहे आणि त्याचप्रमाणे केएल राहुल 37 व्या स्थानावर आहे. आणि इशान किशन 22 व्या स्थानावर पोहचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम, श्रीलंकेचा सादिरा समरविक्रमा, इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल आणि डेव्हॉन कॉनवे यांचाही ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
Asian Games 2023: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी, उमरान मलिक घेणार जागा
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झाम्पा प्रथमच पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आशिया चषक स्पर्धेत दोन सामन्यांत 9 विकेट घेतल्या होत्या. त्याला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे.