Cm Eknath Shinde : ‘विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्याला माहित असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. रत्नागिरीतील राजापुरात आज शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाला महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये कोकणातील सर्वच नेते उपस्थित असल्याचे दिसून आले आहेत. या अभियानात संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केलीयं.
पवारसाहेब रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोटाच्या कपाळी गोटा अशी एक म्हण आहे, आगामी निवडणुकीत कोकणी माणसं ही म्हण खरी करुन दाखवणार आहेत. कारण विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्याला माहित असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं नाव घेता म्हणाले आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोख उद्धव ठाकरेंकडेच असल्याचं दिसून आलं आहे.
आमची युती आधीचीच, आता वंचित महाविकास आघाडीचा घटक ; संजय राऊत स्पष्टच बोलले
तसेच राज्यातील विघ्नसंतुष्ट लोकांचा आम्ही नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे खरी शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी नाहीतर तत्वांसाठी लढाई केली असल्याचा पुर्नरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरही एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करीत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राम मंदिर हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. आज स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठ थोपटली असते कारण मोदींनी मंदिर बांधून स्वप्न पूर्ण केलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. एकीकडे महायुतीमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशातच आता काही दिवसांतच लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना ऊत आला आहे. सध्या दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असून पुढील काही दिवसांतच महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्मूला समोर येणार असल्याची शक्यता आहे.