Download App

‘मी घरात बसून आदेश देणारा नाही तर फिल्डवरचा CM’; शिंदेंची ठाकरेंवर जहरी टीका

Image Credit: Letsupp

Eknath Shinde News : मी घरात बसून आदेश देणारा नाहीतर फिल्डवर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री असल्याची जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. दरम्यान, वाशिममध्ये आज महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

वंचित मविआत येणार की नाही? राऊत म्हणाले, आंबेडकर हे मायावतींसारखं….

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हा एकनाथ शिंदे तुमच्यातला एक आहे. तुम्हाला कधीही भेटू शकतो. हा जमिनीवरचा कार्यकर्ता असून काल, आज आणि उद्याही कार्यकर्ता असेल म्हणून कोणीही मला येऊन भेटतात. लोक म्हणतात सीएम म्हणजे मुख्यमंत्री पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. मी फिल्डवर जाऊन काम करणारा माणूस आहे, घरात बसून आदेश देणारा हा मुख्यमंत्री नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

राज्यात आजही वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता, विदर्भ-मराठवाड्याला येलो अलर्ट

तसेच हे सरकारं फसवणारं नाही दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. खोटी आश्वासने कधीच देणार नाही. आम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा आरक्षण देणार आहे. हा निर्णय आम्ही घेतला आणि शपथ पूर्ण केली आहे. या निर्णयामुळे आज पोलिस भरतीत मराठा मुलं उभं राहिली आहेत. तोंडाला पानं पुसणारं आमचं सरकार नाही पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा केल्या होत्या, नंतर आम्ही पैसे दिले आहेत. जे बोलेल ते करणारं सरकार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

महिलांनी आता पुरुषांच्या बरोबरीने नाहीतर पुढे येऊन काम करायचं आहे. महिला असंख्य हालअपेष्टा सहन करुन कुटुंबाचा सांभाळ करीत असते. अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले मानधन वाढवलं आहे. आशा सेविकांनाही सरकार निराश करणार नाही ते दुर्गम भागात जाऊन ते काम करतात. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. महिला बालविकास माध्यमातून पाच हजार पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतलायं. महिला बालविकास अंतर्गत महिलांसाठी 3 हजार कोटींची तरतूद सरकारने केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज