Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (udhav Thackeray) यांना त्यांची पत पाहूनच इंडिया आघाडीने (India Alliance) सभेत बोलण्याची संधी दिली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुका जाहीर होताच इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईत पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांना अवघे पाचच मिनिटे भाषण करण्याची वेळ दिली होती. या वेळेवरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिवचलं आहे. मुंबईतून शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
रिपाइंला लोकसभेची एकही जागा न मिळाल्यास एनडीएची साथ लगेच…; आठवलेंचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीने त्यांची पत पाहुन पाच मिनिटेच बोलण्याची संधी दिली आहे. आता त्यांच्याकडे ना शिवसेना राहिली, ना आमदार, ना खासदार राहिलेत. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाच्या ताकदीनूसार बोलण्याची वेळ दिली आहे. ठाकरेंना पत पाहूनच फक्त 5 मिनिट भाषण करायला दिलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये बंपर भरती सुरू, दहावी पास ते आयटीआय उमेदवार करू शकतात अर्ज
तसेच ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवरुन देशाला संबोधित केलं. त्याच शिवाजी पार्कच्या सभेत सावरकरांचा अपमान करणारे, शिवसेनेला अच्छूत मानणाऱ्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांनी गळाभेट घेतली आहे. कालच्या सभेत हिंदु शब्द बोलण्याचीही त्यांची हिंमत झाली नाही, त्यामुळे हा शब्द बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कालच्या सभेनंतर त्यांच्याकडून आता हिंदू शब्द रद्द झाला असल्याचीही टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केलीयं.
दरम्यान, कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उत्तर प्रदेश काश्मीर बिहारमधून जे नेते तडीपार झाले आहेत. या नेत्यांना लोकांनी तडीपार केले आहे. सगळे काल एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की हे धरुन बांधून आणलेत हे दुर्देव आहे. कालचा काळा दिवस होता. सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली आहे. ठाकरे गटाने आधी जाऊन माफी मागितली पाहिजे होती. सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांसोबत बोलावं लागतं, स्टॅलिन, मुफ्ती मोहम्मद, फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत बसायचं म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे, कालच्या सभेत माझ्या तमाम हिंदू बांधव हा शब्द रद्द झाला असल्याची सडकून टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.