Download App

विरोधकांचं सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देण्याचं काम; CM एकनाथ शिंदेंनी डिवचलं

Cm Eknath Shinde : विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देण्याच काम केलं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी डिवचलं आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर आज ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत सारा तेंडुलकरची पार्टी; संतापलेल्या अभिनेत्रीने उचललं हे पाऊल

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला होता. या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासूनच निकाल दिला आहे. विरोधकांकडून पुरावे सादर करण्यात आलेले नव्हते. शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. आता ते विधानसभा अध्यक्षांसह निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरही खालच्या पातळीवर भाष्य करीत आहेत. विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देण्याचं काम केलं असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे.

Kolhapur Loksabha : पाटील, मंडलिक, महाडिक की आणखी कोणी? पाहा व्हिडिओ

लोकशाहीत मनमानी, हुकूमशाही करता येणार नाही :
लोकशाही प्रत्येक पक्षात असते. तुम्ही स्वत:ची प्रायव्हेट कंपनी समजून पाहिजे, तसे निर्णय घेऊ शकत नाहीत. तुम्ही 2019 साली भाजपसोबत निवडणूका लढवल्या. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. शेवटी कालच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे, हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दोन्ही गटाचे आमदार पात्र, आता कोणाचा व्हीप लागू होणार? काय म्हणतात कायदेतज्ज्ञ…

ही मोठी चपराकच…
बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचा विरोध केला तुम्ही त्यांनाच खांद्यावर घेतलं. आता तुमच्याकडून दबाव, मॅच फिक्सिंगचे आरोप केले जात आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याने ही विरोधकांनी मोठी चपराक असून मोठा धक्का आहे. त्यांचे आमदार अपात्र केले नाहीत त्यावर आम्ही कायदेशीर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मेरीटवर निकाल लागला की ते खालच्या पातळीवर टीका करतात. सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देण्याचं काम त्यांनी केलं ते काय करतील हे सांगू शकत नाही. शेवटी मेरीट तपासूनच सगळं काही होईल मेरिट आमच्या बाजूने आहे, त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर देत बसणार नसल्याचं शिंदे म्हणाले आहेत.

follow us